जम्मू काश्मीर - कुपवारामध्ये चकमकीत एक जवान शहीद, तर एक दहशतवादी ठार

By Admin | Updated: June 15, 2016 11:05 IST2016-06-15T11:05:50+5:302016-06-15T11:05:50+5:30

कुपवारा जिल्ह्यात लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला असून एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे

Jammu Kashmir - A militant killed in a clash between Kupwara and a terrorist killed | जम्मू काश्मीर - कुपवारामध्ये चकमकीत एक जवान शहीद, तर एक दहशतवादी ठार

जम्मू काश्मीर - कुपवारामध्ये चकमकीत एक जवान शहीद, तर एक दहशतवादी ठार

ऑनलाइन लोकमत - 
श्रीनगर, दि. 15 - कुपवारा जिल्ह्यात लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला असून एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. अजूनही चकमक सुरु असल्याची माहिती लष्कराच्या अधिका-यांनी दिली आहे.  
 
मंगळवारी रात्रीपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार चकमकीत पाच जवान जखमी झाले आहेत. कुपवारामधील मचील सेक्टरमध्ये ही चकमक सुरु आहे. काही दहशतवादी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी सीमारेषेवर लष्कराच्या जवानांनी त्यांना अडवलं असताना दहशतवाद्यांनी जवांनावर हल्ला केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 

Web Title: Jammu Kashmir - A militant killed in a clash between Kupwara and a terrorist killed