शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 14:36 IST

Election Result 2024: हरयाणात काँग्रेसचा पराभव झाला, तर जम्मू-काश्मीरमध्ये पक्षाला फक्त 6 जागा जिंकता आल्या.

Jammu Kashmir & Haryana Election Result 2024: जम्मू-काश्मीर आणि हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी हरयाणातील काँग्रेस कार्यकर्त्यांना 'बब्बर शेर' म्हणत त्यांचे आभार मानले. तर, जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्ससोबत आघाडी करुन सत्ता मिळवल्याबाबत म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील जनतेचे मनापासून आभार. राज्यातील इंडिया आघाडीचा विजय हा संविधानाचा विजय आहे. हा लोकशाही स्वाभिमानाचा विजय आहे.

मीडियाशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, "आम्ही हरयाणाच्या अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत. अनेक विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या तक्रारींबाबत आम्ही निवडणूक आयोगाला माहिती दिली आहे. हरयाणातील सर्व जनतेच्या पाठिंब्याबद्दल आणि आमच्या बब्बर शेर कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद. आम्ही हक्कांसाठी, सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी हा संघर्ष सुरूच ठेवू आणि सामान्यांचा आवाज उठवत राहू."

जम्मू-काश्मीरबद्दल बोलायचे झाल्यास, शेअक अब्दुल्ला घराण्याच्या नेतृत्वातील नॅशनल कॉन्फरन्स (NC) हा जम्मू आणि काश्मीरमध्ये 42 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. तर, काँग्रेसला 6 जागा मिळाल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी तितकीशी चांगली राहिली नाही. जम्मू भागात तर काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली.

काँग्रेस कमकुवत झाली?लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस हरियाणातसरकार स्थापन करू शकते, असे मानले जात होते. परंतु निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसच्या आशा मावळल्या आहेत. हरियाणातील पराभवानंतर महाराष्ट्र आणि झारखंडसारख्या राज्यांमध्ये मित्रपक्षांशी समन्वय साधण्यात काँग्रेसची स्थिती आता कमकुवत होऊ शकते. या दोन्ही राज्यांमध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीharyana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४jammu and kashmir assembly election 2024जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपा