शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाटण्याच्या तुलतेन काश्मीर सुरक्षितच; राज्यपालांकडून अजब तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 17:50 IST

पाटण्यातील कायदा सुव्यवस्थेवर जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांनी ठेवलं बोट

लखनऊ: जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अतिशय सामान्य आहे. या भागात गेल्या काही दिवसांमध्ये कोणतंही हत्याकांड घडलेलं नाही, असं राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे. काश्मीरमध्ये सारं काही आलबेल असल्याचं सांगताना त्यांनी तिथल्या परिस्थितीशी तुलना पाटण्याशी केली. पाटण्यात जितके खून दिवसभरात होतात, तितके मृत्यू काश्मीरमध्ये एका आठवड्यात होतात, असा अजब दावा मलिक यांनी केला. या दाव्यावरुन वाद होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमाला सत्यपाल मलिक उपस्थित होते. त्यावेळी जम्मू काश्मीरमधील परिस्थिती अतिशय सर्वसामान्य असल्याचं मलिक यांनी सांगितलं. 'जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती देशातील इतर राज्यांसारखीच आहे. तिथं कोणतंही हत्याकांड झालेलं नाही. जितक्या हत्या पाटण्यात दिवसभरात होतात, तितके मृत्यू काश्मीरमध्ये आठवड्यात होतात. काश्मीरमध्ये आता दगडफेकीच्या घटना घडत नाहीत. दहशतवादी संघटनांमधील भरतीदेखील थांबली आहे,' असं मलिक म्हणाले.जम्मू-काश्मीरमधील स्थिती नियंत्रणात असल्याचं सांगताना सत्यपाल मलिक यांनी पाटण्यातील गुन्हेगारीचा संदर्भ दिला. सत्यपाल मलिक यांची नियुक्ती मोदी सरकारकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पाटण्यात संयुक्त जनता दलासह भाजपा सत्तेत आहे. मलिक यांनी पाटण्यातील गुन्हेगारी जास्त असल्याचा दावा अप्रत्यक्षपणे त्यांच्या विधानातून केला आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये सत्तेत असलेला भाजप आणि जेडीयू यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया येणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBiharबिहारBJPभाजपा