शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पीडीपीचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं; राज्यपालांकडून विधानसभाच बरखास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 21:59 IST

पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला धक्का

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये वेगानं घडामोडी घडत आहेत. पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र लिहिल्यावर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा आदेश दिला आहे. मुफ्ती यांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या मदतीनं सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले होते. यासाठीचं पत्र राज्यपालांना पाठवत असल्याची माहिती मुफ्ती यांनी ट्विटरवरुन दिली. मात्र त्यापूर्वीच राज्यपालांनी विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला धक्का बसला आहे. पीडीपीच्या मेहबूबा मुफ्तींनी नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेसच्या पाठिंब्यानं सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. यासाठीचं पत्र राज्यपालांकडे पाठवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली होती. मात्र यानंतर लगेचच राज्यपालांनी विधानसभा बरखास्त केली. 'नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसनं पीडीपीला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला आहे. विधानसभेत नॅशनल कॉन्फरन्सचे 15, तर काँग्रेसचे 12 सदस्य आहेत. त्यामुळे पीडीपीकडे एकूण 56 आमदारांचा पाठिंबा आहे. मी सध्या श्रीनगरमध्ये असल्यानं आता तुमची भेट घेणं शक्य नाही. लवकरच तुमची भेट घेऊ,' असं मुफ्तींनी पत्रात म्हटलं होतं. मार्च 2015 मध्ये भाजपा आणि पीडीपीनं जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केलं होतं. मात्र यावर्षीच्या जून महिन्यात भाजपानं सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर 19 जूनपासून राज्यात राज्यपाल राजवट लागू आहे. त्यामुळे आज दिवसभर पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. राज्यपाल राजवट संपुष्टात आणून राजकीय अस्थिरता संपवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र राज्यपालांच्या निर्णयामुळे त्यांना धक्का बसला आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीBJPभाजपाPDPपीडीपीcongressकाँग्रेस