Corona Vaccination : कार्याला सलाम! तबस्सुम शेतात जाऊन राबवतायेत लसीकरण मोहीम, आतापर्यंत 7000 लोकांना टोचली लस  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 07:26 PM2021-06-04T19:26:13+5:302021-06-04T19:35:19+5:30

Corona Vaccination : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी लस हे एक महत्त्वाचे शस्त्र असून जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये या शस्त्राचा चांगला वापर केला जात आहे.

jammu kashmir fight against covid-19 tabasum of pulwama vaccinated 7000 residents till now | Corona Vaccination : कार्याला सलाम! तबस्सुम शेतात जाऊन राबवतायेत लसीकरण मोहीम, आतापर्यंत 7000 लोकांना टोचली लस  

Corona Vaccination : कार्याला सलाम! तबस्सुम शेतात जाऊन राबवतायेत लसीकरण मोहीम, आतापर्यंत 7000 लोकांना टोचली लस  

Next
ठळक मुद्देपुलवामा भागातील हेल्थ वर्कर तबस्सुम यांच्या कार्याचे प्रत्येकजण कौतुक करीत आहे.

पुलवामा : देशातील कोरोना व्हायरसची दुसरी लाट हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी विविध राज्यांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाइन वर्कर्स वेगाने काम करत आहेत. देशातील कोरोना लसीकरण मोहीमेचा वेगही वाढवण्यात आला आहे. कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी लस हे एक महत्त्वाचे शस्त्र असून जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये या शस्त्राचा चांगला वापर केला जात आहे. (jammu kashmir fight against covid-19 tabasum of pulwama vaccinated 7000 residents till now)

पुलवामा भागातील हेल्थ वर्कर तबस्सुम यांच्या कार्याचे प्रत्येकजण कौतुक करीत आहे. अन्नदात्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी तबस्सुम या शेतात जाऊन त्यांना लस देत आहे. तबस्सुम यांनी आतापर्यंत सात हजाराहून अधिक लोकांना लस दिली आहे.  कोरोनास लस टोचण्यासोबतच इतर लोकांनाही लसीचा डोस घ्यावा, यासाठी त्या लोकांना प्रेरित करत आहेत. तबस्सुम यांनी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लसीकरणावर जास्त भर देत आहेत. शेतात जाणाऱ्या कठीण रस्त्यांची ती पर्वा न करता. तसेच, उन्हाची किंवा पावसाची चिंता न करता त्या सतत लोकांच्या सेवेत गुंतलेल्या दिसून येत आहेत. यासंबंधीचे वृत्त 'आजतक' या हिंदी वेबसाइटने दिले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कोरोना रुग्णांची संख्या 2 जून रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचे नवीन 171 रुग्ण आढळले होते, तर 24 तासांत कोरोनामुळे 24 रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, देशातील कोरोना रुग्णांची संख्या आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1,32,364 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, या कालावधीत 2,713 लोकांचा मृत्यू झाला. परंतु, गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीच्या तुलनेत नवीन प्रकरणे आणि मृत्यूचे आकडे कमी झाले आहेत. गुरुवारी म्हणजेच 3 जून रोजी झालेल्या कोरोनाच्या आकडेवारीनुसार 1,34,154 नवीन प्रकरणे आणि 2,887 मृत्यूची नोंद झाली.


कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताचा रिकव्हरी रेट वाढला
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी देशातील कोरोना संक्रमणाच्या स्थितीची माहिती दिली. मंत्रालयाने म्हटले आहे, की गेल्या 8 दिवसांपासून देशात रोज 2 लाखपेक्षा कमी कोरोना रुग्ण समोर येत आहेत. एकूण दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या 68 टक्यांनी घटली आहे. मात्र, 5 राज्यांतून अद्यापही 66 टक्के कोरोना रुग्ण समोर येत आहेत तर उरवरीत 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून 33 टक्के रुग्ण समोर येत आहेत. तर गेल्या 24 तासांत एकूण 1,32,000 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. कोरोनाच्या ताज्या स्थितीसंदर्भात आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या रिकव्हरी रेट 93.1 टक्के एवढा आहे. देशातील 377 जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांनी कमी आहे. आरोग्यमंत्रालयाने म्हटले आहे, की सात मेरोजी कोरोना पीकवर पोहोचल्यानंतर, आतापर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत 68 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. 10 मेरोजी उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पीकवर पोहोचल्यानंतर, आतापर्यंत त्यात 21 लाखहून अधिकची घट झाली आहे.

Web Title: jammu kashmir fight against covid-19 tabasum of pulwama vaccinated 7000 residents till now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.