शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 20:48 IST

Jammu Kashmir Election 2024 : राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपने त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

Jammu Kashmir Election 2024 : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी राज्यात जोरदार प्रचार करत आहेत. आज, बुधवारी त्यांनी जम्मू जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स (NC) च्या उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित निवडणूक रॅलीला संबोधित करताना, भाजपने अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि इन्कम टॅक्स (आयटी) सारख्या केंद्रीय एजन्सीचा वापर केल्याचा आरोप. यादरम्यान त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी काश्मिरी पंडितांना पीओके निर्वासित म्हटले.

भाषण करताना राहुल गांधी गोंधळले आणि त्यांनी काश्मिरी पंडितांना PoK निर्वासित म्हटले. मात्र, नंतर त्यांची चूक लक्षात आल्याने त्यांनी आपले विधान दुरुस्त केले. मात्र आता भाजप या वरुन काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.

काय म्हणाले राहुल?"निवडणुकीपूर्वी राज्याचा दर्जा बहाल व्हावा, अशी आमची इच्छा होती. जम्मू-काश्मीरच्या सर्व जनतेला राज्याचा दर्जा बहाल केल्यानंतर निवडणुका व्हाव्यात, असे वाटत होते. तसे झाले नाही. पण, निवडणूक झाल्यानंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करावा लागेल. त्यांनी तसे केले नाही, तर केंद्रात आमचे सरकार स्थापन होताच आम्ही जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करू," असे राहुल म्हणाले. यादरम्यान राहुल यांची जीभ घसरली आणि ते म्हणाले की, "मनमोहन सिंग यांनी पीओकेमधून आलेल्या निर्वासितांना दिलेले वचन पूर्ण केले जाईल.ठ मात्र, नंतर त्याला आपली चूक लक्षात आली. त्यांनी लगेच चूक सुधारुन म्हटले, "माफ करा, मनमोहन सिंग यांनी काश्मिरी पंडितांना दिलेले वचन पूर्ण केले जाईल."

भाजपचा निशाणा आता भाजपने राहुल यांच्या स्लिप ऑफ द टंगचा मुद्दा बनवला आहे. "हा माणूस पीओकेमधील निर्वासित आणि काश्मिरी पंडित यांच्यात फरक करू शकत नाही आणि स्वतःला गांभीर्याने घेण्याची अपेक्षा करतो. प्रतिनिधित्व करण्यासाठी विरोधी पक्षाकडे नक्कीच कोणीतरी योग्य व्यक्ती असेल. या बालक बुद्धीला आमच्यावर लादल्याबद्दल काँग्रेसला लाज वाटली पाहिजे," अशी बोचरी टीका भाजपने केली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक 2024