Jammu And Kashmir : पाच जिल्ह्यांतील मोबाईल सेवा पुन्हा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 12:10 PM2019-08-29T12:10:16+5:302019-08-29T12:16:22+5:30
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथील करण्यात येत आहे. जम्मूमधील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधूनकलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. जम्मूमधील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तसेच याआधी काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये सुरू झाली आहेत. डोडा, रामबन, राजौरी, पूंछ आणि किश्तवाड या पाच जिल्ह्यांतील मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूमधील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 5 ऑगस्ट रोजी ही सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता 25 दिवसांनी डोडा, रामबन, राजौरी, पूंछ आणि किश्तवाड या पाच जिल्ह्यांतील मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र काही जिल्ह्यातील मोबाईल सेवा ही अद्याप ठप्पच आहे.
कलम 370 आणि कलम 35 अ बाबत केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तसेच राज्यातील बहुतांश भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र काही दिवसांनंतर हळूहळू निर्बंध हटवण्यात आले होते. याआधी जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासी या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा संथगतीने सुरू करण्यात आली होती. मात्र जम्मूमध्ये पसरवत येण्यात असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तातडीने बंद करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला होता.
Mobile phone services snapped across #JammuAndKashmir since August 5, resumed in five districts of Jammu region- DODA, KISHTWAR, RAMBAN, RAJOURI and POONCH pic.twitter.com/DO6BK3halF
— ANI (@ANI) August 29, 2019
जम्मू- काश्मीर आणि लडाखच्या विकासाची आखणी सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी जम्मू- काश्मीरमध्ये लवकरच नोकरभरती सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बुधवारी (28 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत केली आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, आगामी दोन- तीन महिन्यात जम्मू- काश्मीर आणि लडाखमध्ये सरकारी खात्यातील 50 हजार जागा रिक्त असून या जागेवर लवकरच मेगाभरती करणार आहे. त्यामुळे या भरतीचा फायदा या राज्यातील तरुणांनी घ्यावा असे आवाहन मलिक यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे येत्या दोन दिवसांत काश्मीरच्या विकासाच्या दृष्टीने काही मोठ्या घोषणा करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
J&K Governor Satyapal Malik: We today announce 50,000 jobs in J&K administration, we will appeal to the youth to get involved with full vigour, in coming 2-3 months we will fill these positions pic.twitter.com/0xrWBwn2hA
— ANI (@ANI) August 28, 2019
तसेच राज्यातील जनतेला विविध अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील परिस्थिती सुधारत असून तेथील निर्बंध हळूहळू शिथील करण्यात येणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी लॅडलाईन सेवा चालू करण्यात आली आहे, तर जम्मू मधील सर्व 10 जिल्ह्यांमधील मोबाईल सेवा देखील सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे हळूहळू इंटरनेट सेवाही पूर्वपदावर आणण्याचं आश्वासन त्यांनी पत्रकार परिषदेत दिलं आहे.