जम्मू काश्मीरात सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

By Admin | Updated: June 24, 2017 19:04 IST2017-06-24T19:04:40+5:302017-06-24T19:04:40+5:30

दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत

In Jammu Kashmir, the CRPF jawans were attacked by terrorists, a young martyr | जम्मू काश्मीरात सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

जम्मू काश्मीरात सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. श्रीनगर - जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पंथा चौक येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर हल्ला चढवला. दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा होता अशी माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे.
 
""दहशतवाद्यांकडे एके रायफल्स होत्या. सहा वाजल्याच्या आसपास त्यांनी सीआरपीएफच्या वाहनावर हल्ला केला. हे वाहन सीआरपीएफ गस्ती पथकाच्या 29 बटालियनचा भाग होते. श्रीनगरमध्ये पंथा चौकात बस स्टॅण्डजवळ हा हल्ला करण्यात आला"", अशी माहिती अधिका-याने दिली आहे.
 
दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस, निमलष्करी दल आणि लष्कराने संयुक्त कोम्बिंग आणि सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असून श्रीनगर - जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. 
 

Web Title: In Jammu Kashmir, the CRPF jawans were attacked by terrorists, a young martyr