शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 20:54 IST

बीएसएफच्या 35 जवानांना घेऊन जात असताना बस एका कड्यावरून घसरल्याने हा अपघात झाला.

काश्मीरच्या बडगाममध्ये मोठा अपघात झाला आहे. निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेली एक बस जिल्ह्यातील वाटरहॉल भागात दरीत कोसळली. या अपघातात बीएसएफचे अनेक जवान जखमी झाले आहेत. बीएसएफच्या 35 जवानांना घेऊन जात असताना बस एका कड्यावरून घसरल्याने हा अपघात झाला. या अपघातात बसचेही मोठे नुकसान झाले आहे. येथील ब्रेल गावातील नाल्यात ही बस कोसळली आहे.

बस अपघातात चार जवानांचा मृत्यू -बीएसएफच्या पीआरओने अपघातात बीएसएफच्या तीन जवानांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. अपघातस्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना खानसाहीब आणि बडगाम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथून दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी बडगामकडे येत असताना हा अपघात झाला.

25 सप्टेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील 26 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. बसमधील 35 जवानांपैकी सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस खान साहिब वाटरहॉल पोलीस चौकीवर जात होती. मात्र साधारणपणे 5 वाजण्याच्या सुमारास पोलीस चौकीपासून केवळ 600 मीटर दूर असतानाच हा अपघात झाला.

यापूर्वीही जम्मू भागातील राजौरी येथे जवानांच्या वाहनाला अपघात झाला होता. बुधवारी (18 सप्टेंबर, 2024) मांजकोट परिसरात जवानांचे वाहन 400 फूट खोल दरीत कोसळले. बुलेट प्रूफ वाहनात पॅरा-2 युनिटचे जवान बसलेले होते. यात सहा कमांडो जखमी झाले होते. तर एका लान्स नायकाच मृत्यू झाला होता. 

टॅग्स :AccidentअपघातJammu Kashmirजम्मू-काश्मीरBSFसीमा सुरक्षा दलDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल