शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमधील निवडणुका झाल्यानंतर कलम ३७० संपुष्टात आणण्याविरोधात प्रस्ताव पारित करणार, उमर अब्दुल्लांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 09:15 IST

Jammu Kashmir Assembly Election 2024: जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० (Article 370) रद्द करण्यात आल्यानंतर आता पाच वर्षांनी या राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. दरम्यान, काश्मीरमधील प्रमुख पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फ्ररन्सचे नेते उमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी मोठं विधान केलं आहे.

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर आता पाच वर्षांनी या राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. दरम्यान, काश्मीरमधील प्रमुख पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फ्ररन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी मोठं विधान केलं आहे. जम्मू काश्मीरमधील विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात प्रस्ताव पारित केला जाईल, असं विधान उमर अब्दुल्ला यांनी केलं.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जम्मू-काश्मीर विधानसभा आपल्या पहिल्या कामाच्या रूपामध्ये या भागाला राज्य म्हणून असलेला दर्जा आणि विशेष राज्याचा दर्जा हिरावणाऱ्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात प्रस्ताव पारित करेल. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणूक घेण्याची घोषणा केल्यानंतर उमर अब्दुल्ला यांनी हे विधान केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये १८, २५  सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ४ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याआधी २०१४ मध्ये नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक झाली होती. तसेच निवडणुकीनंतर भाजपा आणि पीडीपी यांनी आघाडी सरकार स्थापन केलं होतं. हे सरकार कोसळल्यानंतप १९ डिसेंबर २०१८ पासून काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन लागू आहे.

जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घोषित झाल्यानंतर उमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल होईपर्यंत निवडणुकीत सहभागी होण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांचे वडील आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला हे विधानसभा निवडणुकीत पक्षाचं नेतृत्व करणार आहेत.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Omar Abdullahउमर अब्दुल्ला