शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीरात लष्कर जवानांनी केलं दोन दहशतवाद्यांना ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 09:54 IST

लष्कर जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. जम्मू काश्मीरमधील लितर गावात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासूनच चकमक सुरु होती. यावेळी काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती.

श्रीनगर - लष्कर जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. जम्मू काश्मीरमधील लितर गावात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासूनच चकमक सुरु होती. यावेळी काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालत कारवाईला सुरुवात केली. लष्कर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली होती. लष्कराने दहशतवाद्यांना चोख उत्तर देत ठार केलं आहे. वसीम शाह आणि हाफिज निसार अशी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. दोघे दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे होते. त्यांच्याकडून एके-47, एके -56 आणि सहा एके मॅगझिन जप्त करण्यात आल्या आहेत.

याआधी काश्मिरात विमानतळाजवळ सीमा सुरक्षा दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा कमांडर खालीद ऊर्फ शाहीद शौकत याला सुरक्षा दलाने सोमवारी एका चकमकीत ठार मारले. याशिवाय शोपियात झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा केला. बारामुल्ला जिल्ह्याच्या लादुरा भागात अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागाला घेरण्यात आले. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांच्या दिशेने गोळी चालविण्यात आल्यानंतर चकमक सुरू झाली. यावेळी जैश-ए-मोहम्मदचा अतिरेकी खालीद हा ठार झाला. शोपिया जिल्ह्यात केल्लर भागात सुरक्षा दलाने एका चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनच्या तीन अतिरेक्यांना ठार मारले. यात हिज्बुलचा म्होरक्या जाहीदसह इरफान आणि आसिफ यांचा समावेश आहे.

रोज होतो पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्माभारतीय जवान रोज पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत, असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केला. पाकिस्तानने गोळीबार केल्यास त्यांना योग्य ते उत्तर द्या, असे आदेश त्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आपण स्वत:हून पाकिस्तानच्या दिशेने गोळीबार करायचा नाही, मात्र तेथून गोळीबार झाला, तर त्यांना जोरात प्रत्युत्तर द्यायचे, असे जवानांना आदेश आहेत. 

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद