शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मोठी दुर्घटना! जम्मू-काश्मीरमध्ये बस 250 मीटर खोल दरीत कोसळली; 36 प्रवाशांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 14:50 IST

प्रवासी बस किश्तवाडहून जम्मूला जात असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील दोडा जिल्ह्यातील आसार भागात त्रंगलजवळ एक प्रवासी बस 250 मीटर खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात  येत आहे. दरम्यान, पोलिस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी बस किश्तवाडहून जम्मूला जात असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिस आणि इतर शासकीय यंत्रणांकडून बचावकार्य सुरू आहे. पोलिस नियंत्रण कक्ष डोडा येथील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "किश्तवाडहून जम्मूला जाणारी एक प्रवासी बस डोडा जिल्ह्यातील असर भागातील त्रंगलजवळ 250 मीटर खोल दरीत कोसळली. या घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू होण्याची भीती आहे."

दुसरीकडे, या घटनेबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे. या दुर्घटनेत दुर्दैवाने 5 जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, आता मृतांचा आकडा वाढला आहे. तसेच, जखमींना आवश्यकतेनुसार जिल्हा रुग्णालयात किश्तवाड आणि जीएमसी डोडा येथे हलवण्यात येत आहे. गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी हेलिकॉप्टर सेवेची व्यवस्था करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार शक्य ती सर्व मदत केली जात आहे. आपण सतत संपर्कात आहे, असेही जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAccidentअपघात