शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 10:29 IST

Jammu-Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्माजवानांनी दहशतवाद्यांना दिलं चोख प्रत्युत्तर पुलवामामधील इंटरनेट सेवा बंद

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.तिक्केन परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांनी मिळाली होती. यानंतर राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपनं घटनास्थळावरुन धाव घेत परिसराला घेराव घातला. यानंतर तेथे चकमक उडाली. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरू झाला. अखेर जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.  घटनास्थळावरुन दोन रायफल ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. लियाकत अहमद आणि वाजिद असे ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. या कारवाईदरम्यान परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. 

दरम्यान, 6 नोव्हेंबरला शोपियानमध्येही जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीतही दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. मोहम्मद इदरीस सुलतान आणि आमिर हुसैन रैदर अशी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं होती. या दोघांचाही दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.  

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान