शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

Jammu-Kashmir: गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये 175 दहशतवाद्यांचा खात्मा, 183 जणांना जिवंत पकडण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 16:39 IST

Jammu-Kashmir:सीआरपीएफने नक्सलग्रस्त राज्यात विविध कारवायांमध्ये 19 माओवाद्यांचा खात्मा केला तर 699 जणांना अटक केली.

नवी दिल्ली: 1 मार्च 2021 ते 16 मार्च 2022 दरम्यान केंद्रीय राखीव पोलिस दलाने (CRPF) जम्मू आणि काश्मीरमध्ये 175 दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर 183 दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले. सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग यांनी गुरुवारी ही माहिती दिली. याच काळात सीआरपीएफने अतिरेकी नक्सलग्रस्त राज्यांमध्ये झालेल्या विविध कारवायांमध्ये 19 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आणि 699 जणांना अटक केली.

सीआरपीएफ शनिवारी जम्मूमधील एमए स्टेडियमवर आपल्या 83व्या स्थापना दिनानिमित्त परेड आयोजित करेल. दिल्ली-NCR बाहेर CRPF आपला स्थापना दिवस साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग म्हणाले की, सध्या जम्मू-काश्मीरमधील वातावरण चांगले आहे. येत्या काळात यात आणखी सुधारणा होईल. ते म्हणाले, “केंद्र सरकारने सशस्त्र दलांना त्यांच्या स्थापना दिनानिमित्त देशात विविध ठिकाणी परेड आयोजित करून लोकांसमोर ताकद दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. हे जवानांसाठी तसेच सामान्य लोकांसाठी, विशेषत: तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल. हे राष्ट्रीय एकात्मतेला देखील मदत करेल."

एएनआयने कुलदीप सिंगच्या हवाल्याने म्हटले की, “सीआरपीएफ देशातील विविध श्रेणीतील 117 लोकांना सुरक्षा कवच देत आहे. व्हीआयपी सुरक्षा शाखेत बत्तीस महिला कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. 5 राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण 41 व्हीआयपींना सीआरपीएफने सुरक्षा पुरवली होती. यापैकी 27 जणांची सुरक्षा निवडणुकीनंतर काढून घेण्यात आली आहे.

दगडफेकीच्या घटना घटल्याकाही दिवसांपूर्वी झालेल्या सीआरपीएफ जवानाच्या हत्येबाबत विचारले असता ते म्हणाले की, या वर्षातील ही पहिलीच घटना आहे. सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ कारवाई करत कमीत कमी वेळात गुन्हेगाराला अटक केली. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर बोलताना CRPF DG कुलदीप सिंह म्हणाले, कलम 370 रद्द केल्यापासून दगडफेकीच्या घटना जवळपास शून्य झाल्या आहेत. विदेशी दहशतवाद्यांची घुसखोरी आणि हल्ले यातही घट झाली आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीDeathमृत्यू