शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir: काश्मीर टार्गेट किलिंग: काश्मिरी पंडीत भावांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, एकाचा मृत्यू तर एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 13:32 IST

Jammu and Kashmir: दहशतवाद्यांना पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडवून आणली असून, ऑगस्ट महिन्यातील ही तिसरी घटना आहे.

Terrorist Attack on Civilian in Shopian: गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडीतांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अनेक काश्मिरी पंडीत आणि बिगर काश्मिरी नागरिकांचा मृत्यू झालाय. आता परत एकदा अशाच प्रकारची घटना शोपियांमध्ये घडली आहे. सोमवारी शोपियांच्या छोटापोरा भागातात दहशतवाद्यांनी सफरचंदाच्या बागेत काम करणाऱ्या दोन भावांवर अचानक गोळीबार केला. या गोळीबारात सुनील भट्ट मृत्यूमुखी पडले तर त्यांचा भाऊ जखमी आहे.

ऑगस्टमधील हा तिसरा हल्ला यावर्षी शोपियांमध्ये परप्रांतीय मजूर आणि स्थानिक लोकांवर दहशतवादी सातत्याने हल्ले करत आहेत. या महिन्यात सामान्य नागरिकांवर झालेला हा तिसरा हल्ला आहे. 12 ऑगस्ट 2022 रोजी जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे एका स्थलांतरित मजुराची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. मोहम्मद अमरेज असे मृताचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. 4 ऑगस्ट 2022 रोजी, दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथे एका गैर-काश्मिरी मजुराची हत्या केली, तर अन्य दोन जण या हल्ल्यात जखमी झाले होते. मुहम्मद मुमताज असे हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो बिहारमधील साकवा परसा येथील रहिवासी होता.

मे आणि जूनमध्ये 10 हल्ले झालेयापूर्वी मे आणि जून महिन्यात दहशतवाद्यांनी अनेक हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये 26 दिवसांत 10 घटना घडल्या. यानंतर अनेक मजुरांनी काश्मीर खोऱ्यातून स्थलांतर करण्यास सुरुवात केली. पोलीस आणि प्रशासनाने टार्गेट किलिंगबाबत कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, लोकांना त्यांच्या सुरक्षेची हमीही दिली होती. पण, आता पुन्हा अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीDeathमृत्यू