शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; शोपियानमध्ये कश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 14:15 IST

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा टार्गेट किलिंगच्या घटना सुरू केल्या आहेत.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडली आहे. यावेळेस दहशतवाद्यांनी राज्याबाहेरील व्यक्तीला नाही, तर काश्मिरी पंडितांवर निशाणा साधला आहे. काश्मीर झोनमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या केली आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी घेतली नाही. कोणत्या संघटनेने ही टार्गेट किलिंग केली, याबाबत पोलिसांनाही माहिती नाही. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी अल्पसंख्याक नागरिक (काश्मिरी पंडित) पूरण कृष्ण भट यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी शोपियानच्या संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू आहे.

टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ जम्मू-काश्मीरमध्ये यावर्षी एप्रिल-मे महिन्यात टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 12 मे रोजी बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. तहसील कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित राहुल भट्ट नावाच्या अधिकाऱ्याला लक्ष्य केले. रुग्णालयात उपचारादरम्यान राहुलचा मृत्यू झाला.

महिला शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्यायानंतर 31 मे रोजी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी रजनीबाला या महिला शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली होती. ती सांबा येथील रहिवासी होती. कुलगाममधील गोपालपोरा येथे त्यांची हत्या करण्यात आली. रजनी या गोपाळपोरा हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. गोळीबारानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

2 जून रोजी बँक व्यवस्थापकावर गोळीबारयानंतर 2 जून रोजी राजस्थानमधील हनुमानगढ येथील रहिवासी कुलगाममधील बँक मॅनेजरवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात बँक व्यवस्थापक विजय कुमार यांचा मृत्यू झाला. विजय कुमार हे कुलगाममधील मोहनपोरा येथील देहाती बँकेत तैनात होते. टार्गेट किलिंगच्या या घटना घडवणाऱ्या बहुतांश दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादDeathमृत्यू