शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराचा दणका; काश्मीरमध्ये वर्षभरात 200 दहशतवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 09:05 IST

लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं

श्रीनगर: यंदाच्या वर्षात भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. भारतीय जवानांनी काल काश्मीर खोऱ्यातील केरन सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे यंदाच्या वर्षात भारतीय लष्कराच्या कारवाईत कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 200 वर गेला आहे. वर्ष संपायला अद्याप दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराची कारवाई सुरुच असल्यानं हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.यंदाच्या वर्षात काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाई केली. लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईचा मोठा दणका जैश-ए-मोहम्मदला बसला आहे. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे 50 टक्के दहशतवादी मारले गेले. तर हिज्बुलच्या 40 टक्क्यांहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लष्कर-ए-तोयबालादेखील भारतीय जवानांनी दणका दिला. त्यांचे 33 टक्के दहशतवादी यंदाच्या वर्षात मारले गेले. यंदाच्या वर्षात भारतीय जवानांनी काश्मीर खोऱ्यात दुहेरी कारवाई केली. सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांसोबतच स्थानिक दहशतवाद्यांचंही आव्हान लष्करासमोर होतं. हे दुहेरी आव्हान लष्करानं यशस्वीपणे पेललं. 2017 मध्ये काश्मीरमध्ये लष्करानं ऑपरेशन ऑल आऊट सुरू केलं होतं. त्याच प्रकारची कारवाई लष्करानं यंदाच्या वर्षातही केली. रमजानच्या पवित्र महिन्यात मोदी सरकारनं काश्मीरमधील दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई थांबवली होती. त्या काळात दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं होतं. त्यामुळे सरकारवर टीकाही झाली. मात्र रमजान संपताच लष्करानं दहशतवाद्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवादJaish e Mohammadजैश ए मोहम्मदLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबाHizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीन