जम्मू-काश्मिरात सत्ताकोंडी फुटणार? महबूबा मुफ्ती जेटलींना भेटल्या
By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:26+5:302015-02-18T23:54:26+5:30
नवी दिल्ली : काश्मिरात पीडीपी- भाजपा सरकार स्थापन करण्याच्या मार्गात अडसर ठरू पाहणारे कलम ३७० सह अनेक मुद्यांवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांतर्गत पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या(पीडीपी) अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली़ महबूबा गत आठवड्यापासून दिल्लीत तळ ठोकून आहे़

जम्मू-काश्मिरात सत्ताकोंडी फुटणार? महबूबा मुफ्ती जेटलींना भेटल्या
न ी दिल्ली : काश्मिरात पीडीपी- भाजपा सरकार स्थापन करण्याच्या मार्गात अडसर ठरू पाहणारे कलम ३७० सह अनेक मुद्यांवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांतर्गत पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या(पीडीपी) अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली़ महबूबा गत आठवड्यापासून दिल्लीत तळ ठोकून आहे़ मीडियाला दूर ठेवण्यासाठी जेटलींच्या निवासस्थानी ही बैठक ठेवली गेली़ जेटलींसोबत भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण सिंह यावेळी हजर होते़ जम्मू-काश्मिरात भाजपाचा सहभाग असलेले आघाडी सरकार स्थापन करण्याच्या उपाययोजनांवर काम करण्यासाठी अरुण सिंह यांना नियुक्त करण्यात आले आहे़ पीडीपी आमदार हसीब दराबू यांनीही जेटलीची भेट घेतली़राज्याच्या ८७ सदस्यीय विधानसभेत सर्वाधिक २८ सदस्य असलेली पीडीपी आणि २५ सदस्य असलेली भाजपा यांच्यात जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७०, वादग्रस्त सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा, विघटनवाद्यांबद्दलचे धोरण अशा काही मुद्यांवर मतभेद आहेत़ या मुद्यांवर तोडगा काढण्याचे दोन्ही पक्षांचे प्रयत्न आहेत़ कलम ३७० आणि सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा या दोन मुद्यावर भाजपाच्या कुठल्याही प्रकारच्या नरमाईस राष्ट्रीस स्वयंसेवक संघाने तीव्र विरोध चालवल्याचे वृत्त आहे़ त्यामुळे मुफ्ती आणि जेटली यांच्यातील चर्चेचा तपशील गोपनीय ठेवण्यात आला़पीडीपी प्रवक्ते नईम अख्तर यांना मुफ्ती -जेटली भेटीबाबत विचारले असता, आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले़