शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

Jammu and Kashmir: कलम 370 रद्द होताच पाकिस्तान बरळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 16:39 IST

मोदी सरकारने काश्मीरचे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं, गेली 70-72 वर्षं वादाचा विषय ठरलेलं राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याबाबतची, त्यातील वादग्रस्त तरतुदी हटवण्याची ऐतिहासिक घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केली. यावरून देशभरात राजकीय पक्षांकडून टीकेची झोड उठलेली असताना पाकिस्तानही खवळला आहे. पाकिस्ताननेभारताला थेट धमकीच देऊन टाकली आहे. 

मोदी सरकारने काश्मीरचे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावरून देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या एकीकडे आनंद व्यक्त होत असताना मोदींचा बिहारमधील मित्रपक्ष जदयूने टीका केली आहे. तसेच काँग्रेस, राजदनेही विरोध केला आहे. या निर्णयावरून एकीकडे भारतातील शेअरबाजार कोसळलेला असताना पाकिस्तानचा शेअरबाजारही कोसळला आहे. तसेच काश्मीरला ताब्यात घेऊ पाहणाऱ्या पाकिस्तानच्याही पायाची आग मस्तकात गेली आहे. आधीच पाकिस्तान कुलभूषण यादव यांच्या बाबतची केस हरलेला असताना त्याने भारताला काश्मीरमुद्द्यावर धमकी दिली आहे. 

काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे. यामुळे एक पक्ष होण्याच्या नात्याने पाकिस्तान या बेकायदेशीर निर्णयाविरोधात आवश्यक पाऊले उचलेल. पाकिस्तान काश्मीरच्या बाबतीत आपली प्रतिबद्धता जपेल, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी भारतावर टीका करताना इशारा दिला आहे. भारताने खूपच खतरनाक खेळ खेळला आहे. याचे उपखंडावर गंभीर परिणाम होणार आहेत. पाकचे पंतप्रधान इम्रान खान काश्मीर प्रश्नाला सोडवण्याकडे घेऊन जाण्यास इच्छुक आहेत. तर भारत हा प्रश्न आणखी चिघळवत आहे. आता काश्मिरींवर पहिल्यापेक्षा जास्त पाहारा ठेवण्यात आला आहे. आम्ही याबाबत संयुक्त राष्ट्राला कळविले आहे. तसेच इस्लामिक देशांनाही याबाबच सांगितले आहे. 

कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचं देशभरात स्वागत होतंय. कारण हे कलम हटवल्यानं सात महत्त्वपूर्ण बदल अंमलात येणार आहेत. त्यावर एक दृष्टिक्षेप... 

१. जम्मू-काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा राहणार नसल्यानं दुहेरी नागरिकत्वाचा विषय संपुष्टात येईल. 

२. जम्मू-काश्मीरबाबत कुठलाही नवा कायदा करण्यासाठी आता राज्य सरकारच्या संमतीची गरज नसेल.

३. राज्य सरकारच्या कायद्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकेल.

४. अन्य राज्यातील नागरिकांना आता जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करता येईल, गुंतवणूक करता येईल.५. जम्मू-काश्मीर पोलीस केंद्र सरकारच्या, केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारित येतील.

६. जम्मू-काश्मीर राज्याचा स्वतंत्र झेंडा होता. तो आता नसेल. ७. राज्यावर आर्थिक आणीबाणी लागू करण्याचा अधिकार मिळेल. 

टॅग्स :Article 370कलम 370Article 35 Aकलम 35-एPakistanपाकिस्तानIndiaभारत