शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरमध्ये 46 दिवसांत तब्बल 24 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 14:45 IST

Jammu And Kashmir : जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान येथे तब्बल 24 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - गेल्या दीड महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाली आहे. जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान येथे तब्बल 24 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये अनेक जैशच्या दहशतवाद्यांचाही समावेश आहे. दुसरीकडे, अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी याच कालावधी दरम्यान फक्त 8 दहशतवादी मारले गेले होते.

गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीर पोलिसांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आणि नागरिकांना लक्ष्य करून कारवाया तीव्र झाल्या आणि परिणामी मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच सुरक्षा दलाचे पाच जवानही शहीद झाले आहेत. त्याच वेळी, या कालावधीत एकही सामान्य नागरिक मारला गेला नसल्याचं अधिकृत आकडेवारीवरून दिसून येत आहे.

2021 मध्ये 193 दहशतवादी ठार झाले. तर 2020 मध्ये 232 दहशतवादी खात्मा झाला. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुासर, आता सुरक्षा दलांमध्ये पूर्वीपेक्षा चांगला समन्वय आहे. 29 जानेवारी रोजी बडगाम आणि पुलवामा येथे झालेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाचे पाच दहशतवादी मारले गेले होते.

पोलिसांनी दहशतवाद्यांची ओळख जैश कमांडर जाहिद वानी, पाकिस्तानी दहशतवादी वाहिद अहमद रिशी आणि दोन स्थानिक रहिवासी कफील उर्फ ​​छोटा पाकिस्तानी आणि इनायतुल मीर अशी केली. शुक्रवारी गृहमंत्र्यांनी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक घेतली. 2018 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे 91 जवान शहीद झाले, तर 2021 मध्ये 42 जवान शहीद झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी