जम्मू-काश्मीर : पाम्पोरमध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान जखमी
By Admin | Updated: October 10, 2016 11:52 IST2016-10-10T08:54:59+5:302016-10-10T11:52:03+5:30
जम्मू-काश्मीरमधील पाम्पोर येथील ईडीआय (EDI)च्या इमारतीमध्ये काही दहशवादी घुसल्याचे वृत्त आहे.

जम्मू-काश्मीर : पाम्पोरमध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान जखमी
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १० - जम्मू-काश्मीरमधील पाम्पोर येथील ईडीआय (EDI)च्या इमारतीवर दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात १ जवान जखमी झाल्याचे समजते.
इमारतीमधून गोळीबाराचे आवाज येत असून २-३ दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळत आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी इमारतील घेरले असून ते दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. गोळीबारानंतर इमारतीमधून धूर येऊ लागल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना आत जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरात हा या इमारतीवर झालेला दुसरा हल्ला आहे. काही महिन्यांपूर्वीच, म्हणजे २५ जून रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर झालेल्या या हल्ल्यात आठ जवान शहीद, तर २२ जखमी झाले होते.