जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांपासून दहशतवादी आणि लष्करात चकमक
By Admin | Updated: October 11, 2016 11:53 IST2016-10-11T10:33:15+5:302016-10-11T11:53:37+5:30
पम्पोरमध्ये गेल्या 24 तासांपासून दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरु आहे. दहशतवादी ईडीआय (EDI)च्या शासकीय इमारतीत लपून बसले असून तेथून वारंवार गोळीबार करत आहे

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांपासून दहशतवादी आणि लष्करात चकमक
ऑनलाइन लोकमत
जम्मू काश्मीर, दि. 11 - पम्पोरमध्ये गेल्या 24 तासांपासून दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरु आहे. दहशतवादी ईडीआय (EDI)च्या शासकीय इमारतीत लपून बसले असून तेथून वारंवार गोळीबार करत आहे. इमारतीत २-३ दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी इमारतील घेरले असून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत.
गोळीबारानंतर इमारतीमधून धूर येऊ लागल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना आत जाण्यास मनाई करण्यात आली. इमारतीतून धुराचे आणि आगीचे लोट सुरु आहेत. या आगीत इमारतीचा पहिला मजला जळून खाक झाला आहे.
जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा सुदैवानं तिथं एकही विद्यार्थी नव्हता. त्यावेळी तिथे फक्त एक कूक होता. इमारतीला आग लागल्यानंतर त्यानं अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावलं. जेव्हा जवान आग विझविण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यात आला.
#WATCH Encounter between security forces and terrorists underway at EDI building in Pampore (J&K) (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/mkyC7hNblg
— ANI (@ANI_news) October 11, 2016
गेल्या वर्षभरात हा या इमारतीवर झालेला दुसरा हल्ला आहे. काही महिन्यांपूर्वीच, म्हणजे २५ जून रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर झालेल्या या हल्ल्यात आठ जवान शहीद, तर २२ जखमी झाले होते.
Encounter between security forces and terrorists underway at EDI building in Pampore (J&K) (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/IHgtXoe357
— ANI (@ANI_news) October 11, 2016