जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये मतदानाला सुरुवात
By Admin | Updated: December 2, 2014 09:17 IST2014-12-02T09:17:03+5:302014-12-02T09:17:03+5:30
जम्मू-काश्मीर विधानसभेच्या १८ आणि झारखंड विधानसभेच्या २० जागांसाठी आज सकाळी कडेकोट बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली आहे.

जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये मतदानाला सुरुवात
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर/रांची, दि. २ - जम्मू-काश्मीर विधानसभेच्या १८ आणि झारखंड विधानसभेच्या २० जागांसाठी आज सकाळी कडेकोट बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली आहे.
जम्मू-काश्मिरात जम्मू क्षेत्रातील तीन आणि खोऱ्यातील दोन जिल्ह्यांच्या १८ विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे़ या दरम्यान १७५ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. तर झारखंडमध्ये २२३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
पहिल्या टप्प्यात राज्यात विक्रमी ७१ टक्के मतदान झाले होते़
झारखंडमध्ये माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा आणि मधू कोडा यांच्याशिवाय तीन मंत्र्यांसह एकूण २२३ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत़ यात ३५ महिलांचा समावेश आहे़ दुसऱ्या टप्प्यासाठी उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रांपैकी ७० टक्के मतदान केंद्रे संवेदनशील असल्याने मोठ्या प्रमाणात सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत़