शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरमध्ये जैश कमांडर जाहिद वानीसह 5 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 11:14 IST

Jammu Kashmir And JeM commander Zahid Wani : गेल्या 12 तासांत दोन ठिकाणी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.  

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu And Kashmir) सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. गेल्या 12 तासांत दोन ठिकाणी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.  मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश कमांडर जाहिद वानी (JeM commander Zahid Wani) आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे. सुरक्षा दलांनी पुलवामामध्ये चार तर बडगाममध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. बडगाममध्ये दहशतवाद्यांकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.

काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत काश्मीर झोन पोलिसांनी एक ट्विटही केलं आहे. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या 12 तासांत झालेल्या दोन चकमकीत दहशतवादी संघटनांच्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मारल्या गेलेल्यांमध्ये जैश कमांडर जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे. हे आमच्यासाठी मोठं यश आहे." सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती या सुरूच आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, बडगाममधील तिलसर, चरार-ए-शरीफ येथे रात्री 10 वाजता सीआरपीएफ आणि पोलिसांनी शोध सुरू करताच, एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर जवानांनी देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. चकमकीत तीन दहशतवादी लपल्याचीही माहिती मिळाली होती. मध्यरात्रीनंतर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलं. त्याच्याकडून एके-56 रायफलही जप्त करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. घटनास्थळावरून अनेक शस्त्रे जप्त करण्यात आल्याचं काश्मीर झोन पोलिसांनी सांगितलं होतं. मारले गेलेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबाच्या  (LeT) रेझिस्टन्स फ्रंटचे होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरच्या किलबाल भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी वेढा घालून शोध मोहीम सुरू केली. कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद