शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir : कलम 370 मधील क्रांतिकारी बदल संयुक्त राष्ट्र रोखू शकतं का?; तात्काळ सुनावणी घेण्यास SCचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 11:43 IST

मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरमधल्या अनुच्छेद 370 ला कमकुवत केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

नवी दिल्लीः मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरमधल्या अनुच्छेद 370 ला कमकुवत केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढची तारीख निश्चित करणार आहेत. त्यानंतर ही सुनावणी होणार आहे. याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं संयुक्त राष्ट्रासंबंधित एक प्रश्नही विचारला आहे.संयुक्त राष्ट्र आमच्या संविधानातल्या कलम 370मधील क्रांतिकारी बदल रोखू शकतं का?, असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 370मधील तरतुदी शिथिल करण्याबरोबरच त्याचं जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात मोदी सरकारनं विभाजन केलं आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यात या निर्णयाला असंवैधानिक सांगितलं आहे.गुरुवारी जेव्हा हे प्रकरण न्यायाधीश एनव्ही रमन्ना यांच्या समोर आले, त्यावेळी त्यांनी काही प्रश्न विचारले. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे सोपवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याचिकाकर्त्याचे वकील एम. एल. शर्मानं यांनी न्यायालयात सांगितलं की, या प्रकरणात पाकिस्तान संयुक्त राष्ट्रात जाऊ इच्छिते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की, पाकिस्तान संयुक्त राष्ट्रात गेल्यास भारताच्या संविधानात केलेला हा बदल रोखू शकतं का?. त्यावर वकिलांनी असं नाही, असं सांगितलं. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-ए