शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

'PoK शिवाय जम्मू-काश्मीर अपूर्ण, पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील', राजनाथ सिंहांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 21:15 IST

'पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पीओकेच्या भूमीचा वापर करत आहे. आजही तेथे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. '

Rajnath Singh : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पीओके आणि पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 9व्या सशस्त्र सेना दिनाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की, जम्मू-काश्मीर पीओकेशिवाय अपूर्ण आहे. पीओके पाकिस्तानचा नाही, तर भारताचा भूभाग आहे. पीओकेच्या जमिनीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी केला जातोय. पीओकेमध्ये दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालवली जातात, असा दावा त्यांनी केला. 

पीओकेमध्ये दहशतवादी केंद्रेजम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे माजी सैनिकांना संबोधित करताना संरक्षण मंत्री म्हणाले की, पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पीओकेच्या भूमीचा वापर करत आहे. आजही तेथे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. सीमेजवळील भागात लाँच पॅड बनवण्यात आले आहेत. भारत सरकारला याची संपूर्ण माहिती आहे. पाकिस्तानने पीओकेत दहशतवादी कारवाया थांबवाव्या, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

भारत नेहमीच पाकिस्तानला वरचडसंरक्षण मंत्री पुढे म्हणतात, भारत आणि पाकिस्तानमध्ये 1965 मध्ये अखनूर येथे युद्ध झाले होते. पाकिस्तानी लष्कराचे प्रयत्न हाणून पाडण्यात भारताला यश आले. इतिहासातील सर्व युद्धांमध्ये भारताने नेहमीच पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तान 1965 पासून अवैध घुसखोरी आणि दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. आपल्या मुस्लिम बांधवांनी दहशतवादाविरुद्ध लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. आजही भारतात घुसणारे 80% पेक्षा जास्त दहशतवादी हे पाकिस्तानचे आहेत. सीमेपलीकडील दहशतवाद 1965 मध्येच संपुष्टात आला असता, परंतु तत्कालीन केंद्र सरकार योग्य पाऊले उचलू शकली नाही.

जम्मू-काश्मीरच्या मुस्लिमांचा पाकिस्तानला पाठिंबा नाहीराजनाथ सिंह म्हणाले, 1965 च्या युद्धादरम्यान किंवा दहशतवादाच्या शिखरावर असताना जम्मू-काश्मीरच्या लोकांनी पाकिस्तानला साथ दिली नाही. अनेक मुस्लिम बांधवांनी दहशतवादाशी लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली. देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या मोहम्मद उस्मान यांच्यासारख्या व्यक्तींच्या बलिदानावरही त्यांनी प्रकाश टाकला.

ओमर अब्दुल्लांचे कौतुक राजनाथ सिंह यांनी ओमर अब्दुल्लांचे कौतुक केले. ते म्हणाले की, काश्मीर आणि देशाच्या इतर भागांमध्ये असलेली दरी कमी करणे हे आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडून या दिशेने पावले उचलली जात आहेत. अखनूरमधील वेटरन्स डे सेलिब्रेशनने हे सिद्ध केले की, अखनूरचे आपल्या हृदयात दिल्लीसारखेच स्थान आहे.

सरकार दिल्ली आणि जम्मू-काश्मीरला समान वागणूक देतेसंरक्षण मंत्री म्हणाले की, भाजप सरकार दिल्ली आणि जम्मू-काश्मीरला समान वागणूक देते. पूर्वीच्या सरकारांनी काश्मीरला वेगळी वागणूक दिली होती. याचा परिणाम असा झाला की या भागातील आपले बंधू-भगिनी दिल्लीशी ज्या प्रकारे जोडले जायला हवे होते, तसे होऊ शकले नाहीत. मला भूतकाळात जायचे नाही कारण आमच्या सरकारचे सर्वात मोठे यश हे आहे की, आम्ही काश्मीर आणि देशाच्या इतर सर्व भागांमधील अंतःकरणातील दरी कमी करण्याचे काम करत आहोत.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तानIndiaभारतPOK - pak occupied kashmirपीओके