शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रेनंतर बदलणार जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 11:41 IST

एन.एन वोहरा यांची जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालपदी 2008 साली संपुआ सरकारने नियुक्ती केली. 2013 साली त्यांना राज्यपालपदी पुन्हा एकदा संधी देण्यात आली. 2014 साली भाजपाप्रणित रालोआ सरकार सत्तेत आल्यावरही त्यांना पदावरुन दूर करण्यात आले नाही किंवा त्यांची बदली करण्यात आली नाही.

नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मीर राज्य सरकार कोसळल्यानंतर या राज्यात राज्यपालांची राजवट लागू करण्यात आली आहे. सध्य़ाचे राज्यपाल एन.एन वोहरा यांच्या पदाचा कार्यकाळ 25 जून रोजी समाप्त होत आहे. सलग दोन वेळा राज्यपालपदी राहिलेल्या वोहरा यांना आता पुन्हा काही वर्षांचा कार्यकाळ मिळणे शक्य दिसत नाही. वोहरा यांच्या जागी काही नावांची चर्चा सुरु झाली आहे. असे असले तरी 28 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरु होत असल्यामुळे वोहरा यांना तात्काळ पदावरुन दूर केले जाणार नाही. 

एन.एन वोहरा यांची जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालपदी 2008 साली संपुआ सरकारने नियुक्ती केली. 2013 साली त्यांना राज्यपालपदी पुन्हा एकदा संधी देण्यात आली. 2014 साली भाजपाप्रणित रालोआ सरकार सत्तेत आल्यावरही त्यांना पदावरुन दूर करण्यात आले नाही किंवा त्यांची बदली करण्यात आली नाही. वोहरा हे सध्या 82 वर्षांचे असून ते मूळचे पंजाबचे आहेत. 159 साली पंजाब कॅडरमधून भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी विविध पदांवर जबाबदारी सांभाळली. संरक्षण खात्याचे सचिव म्हणून काम पाहिल्यानंतर त्यांनी 1994 पर्यंत गृहखात्याचे सचिव म्हणून काम केले. 1994 साली ते सेवानिवृत्त झाले. 1997 साली इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान झाल्यावर पंतप्रधानांचे मुख्य सचिव म्हणूनही त्यांनी कामकाज सांभाळले. 2003 ते 2008 या पाचवर्षांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये वार्ताकार (संवादक, इंटर्लोक्युटर) म्हणून त्यांनी अत्यंत महतत्वाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्यानंतर काही नावांची चर्चा सुरु झाली आहे.

ले. ज. (निवृत्त) सय्यद अता हस्नैन- जम्मू काश्मीर राज्याच्या राज्यपालपदी सय्यद अता हस्नैन यांची निवड होऊ शकते. श्रीनगर येथील चिनार दलाच्या कमांडरपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. हस्नैन यांचा सामान्य लोकांशी संपर्कही आहे.  2010-11 या काळामध्ये ते जनरल ऑफिसर इन कमांडिग पदावरती कार्यरत होते. 12 इन्फ्रंट्री ब्रिगेडचे ते कमांडर होते.

दिनेश्वर शर्मा- राज्यपालपदाच्या चर्चेमध्ये सर्वात आघाडीवर शर्मा यांचे नाव आहे. सध्या केंद्र सरकारचे जम्मू आणि काश्मीरमधील विशेष प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत. दिनेश्वर शर्मा इंटेलिजन्स ब्युरोचे माजी प्रमुख आहेत. 1979 साली ते केरळ कॅडरमधून प्रशासकीय सेवेत आले. त्यांनी अजित डोवल यांच्याबरोबरही काम केले आहे.

राजीव मेहर्षी-1979 च्या राजस्थान कॅडरमधून प्रशासकीय सेवेत पदार्पण केलेले राजीव मेहर्षी जवळजवळ 4 दशके प्रशासकीय सेवांमध्ये आहेत. त्यांनी विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे. मेहर्षी सध्या भारताचे महालेखापाल असून संयुक्त राष्ट्रांच्या बोर्ड ऑफ ऑडिटर्सचे अध्यक्ष आहेत.

एएस. दुलत-अमरजित सिंह दुलत हे रॉचे माजी प्रमुख आहेत. पीडीपी- भाजपा सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही असे त्यांनी गेल्या काही काळामध्ये वारंवार सांगितले होते. काही तज्ज्ञांच्या मते ते जम्मू आणि काश्मीर राज्याचे पुढील गव्हर्नर असू शकतात. त्यांनी श्रीनगरमध्ये आयबीचे विशेष संचालक म्हणून काम केले आहे. त्यांनी काश्मीर- द वाजपेयी इयर्स आणि द स्पाय क्रोनिकल्स रॉ, आयएसआय अँड द इल्युजन ऑफ पीस या पुस्तकांचे लेखन केले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरGovernmentसरकारIndiaभारत