शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Jammu And Kashmir : शोपियानमध्ये जवानांची मोठी कारवाई; चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 12:04 IST

Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं.

श्रीनगर - दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब भागात मनिहाल गावामध्ये आज भारतीय सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली. यामध्ये चकमकीत लष्कर-ए-मुस्तफा आणि लष्कर-ए-तोयबाचे चार दहशतवादी मारले गेले आहेत. या चारही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. तर एक जवान जखमी झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला मोठं यश आलं आहे. आमिर शरीफ, रईस अहमद भट, आकिब मलिक आणि अल्ताफ अहमद वानी अशी चार दहशतवाद्यांची नावं आहेत. हे दहशतवादी लष्कर-ए-मुस्तफा आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या घरातून बेपत्ता झाले होते. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र जमा करण्यात आली आहेत. 

चकमकीदरम्यान एक जवान जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद