जम्मू-काश्मीर : पुलवामा चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा

By Admin | Updated: March 9, 2017 14:43 IST2017-03-09T07:44:34+5:302017-03-09T14:43:02+5:30

जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. चार ते पाच दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Jammu and Kashmir: The elimination of two terrorists in the Pulwama encounter | जम्मू-काश्मीर : पुलवामा चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर : पुलवामा चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 9 -  जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत दोन दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तर एका स्थानिक नागरिकाचाही यात मृत्यू झाला आहे.  बुधवारी रात्रीपासून सुरू असलेली ही चकमक आता देखील सुरू असल्याची माहिती आहे. 
 
पुलवामामधील पडगमपोरा परिसरात ही चकमक सुरू आहे. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवान आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीमेदरम्यान, दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली.  
 
CRPFच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात सध्या 4 ते 5 दहशतवादी लपल्याची माहिती आहे. दरम्यान, ठार करण्यात आलेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे असल्याचे बोलले जात आहे. अहमद गनी आणि मोहम्मद शफी शेरगुजारी अशी खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. 
 

Web Title: Jammu and Kashmir: The elimination of two terrorists in the Pulwama encounter