शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची हत्या; अमित शाहांच्या दौऱ्यावेळेच्या घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 05:26 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असून, याचवेळी पोलीस महासंचालकांच्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे.

जम्मू: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वीच एक मोठा घटना उघडकीस आली आहे. जम्मू-काश्मीरचे कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. हेमंत लोहिया यांचा मृतदेह घरात संशयास्पदरित्या आढळून आला आहे. दुसरीकडे, अमित शाह आपल्या तीन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यासाठी जम्मूत पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, कारागृह पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर लोहिया यांचा नोकर बेपत्ता झाला आहे. त्यामुळे लोहिया यांची हत्या नोकराने केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, नोकराचा शोधही सुरू करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. हेमंत लोहिया यांची हत्या का आणि कोणी केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ऑगस्ट महिन्यात झाली होती नियुक्ती

भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी हेमंत लोहिया यांची दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच ऑगस्टमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या तुरुंग विभागाचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. लोहिया यांच्या घरात नुतनीकरणाचे काम सुरू होते आणि त्यामुळे ते जम्मूमध्ये त्यांचे मित्र राजीव खजुरिया यांच्या कुटुंबासोबत राहत होते. मित्राच्या घरी लोहिया यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत पडलेला आढळून आल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, या घटनेनंतर पोलिस आणि प्रशासन सतर्क झाले आहेत. तसेच तीन दिवसीय दौऱ्यासाठी अमित शाह जम्मूत रात्री दाखल झाले. अमित शाह जम्मूत येत असतानाच ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली असून, सुरक्षेच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस