शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"...तर त्यांनी निवडणूक लढू नये!" उमर अब्दुल्ला यांचा काँग्रेसला सल्ला; स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 19:09 IST

"निवडणुकीत जिंकल्यानंतर, ईव्हीएम स्वीकारणे आणि हरल्यानंतर, त्याला दोषी ठरवणे दुटप्पीपणाचे..."

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री तथा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी ईव्हीएमवरील (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच, निवडणुकीत जिंकल्यानंतर, ईव्हीएम स्वीकारणे आणि हरल्यानंतर, त्याला दोषी ठरवणे, हे दुटप्पीपणाचे आहे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ते पीटीआयच्या मुलाखतीत बोलत होते.

उमर अब्दुल्ला म्हणाले, ‘‘जेव्हा याच ईव्हीएमच्या माध्यमाने संसदेत आपले शंभरहून अधिक खासदार पोहोचतात आणि आपण याला पक्षाचा विजय म्हणून साजरे करता, तेव्हा काही महिण्यांनंतर, हे इव्हीएम आपल्याला पसंत नाही, कारण निवडणुकीचे निकाल आता आम्हाला हवे तसे येत नाहीयेत, असे म्हणू शकत नाही. यावर, आपण भाजपच्या प्रवक्त्याप्रमाणे बोलत आहात, असे म्हटले असता, अब्दुल्ला म्हणाले, ‘‘देव न करो, हे असेच आहे. जे खरे आहे, ते खरे आहे. आपण आघाडीतील सहकाऱ्यांप्रति निष्ठे ऐवजी सिद्धांतांवर बोलतो."

त्यांनी निवडणूक लढू नये -यावेळी, सर्वसाधारणपणे विरोधी पक्ष आणि विशेषतः काँग्रेस ईव्हीएमवर लक्ष केंद्रित करून चुकीचा मार्गावर जात आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराजयानंतर, काँग्रेसने ईव्हीएम आणि निवडणूक निकालांच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी निवडणुकीत बॅलेट पेपरवर परतण्याची मागणी केली आहे, असे विचारले असता उमर अब्दुल्ला म्हणाले, "जर पक्षांना मतदान व्यवस्थेवर विश्वास नसेल तर त्यांनी निवडणूक लढवू नये. जर आपल्याला ईव्हीएमची समस्या असेल, तर त्यासंदर्भात आपली भूमिका एकसारखीच असायला हवी."

यावेळी उमर अब्दुल्ला यांनी सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचे कौतुकही केले. "मला वाटते की दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात जे काही होत आहे, अत्यंत चांगली गोष्ट आहे. माझ्या मते, नवीन संसद भवन बांधणे ही एक चांगली कल्पना होती. आम्हाला संसदेच्या नवीन इमारतीची गरज होती, जुन्या इमारतीची उपयुक्तता संपली आहे’’  

टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेसEVM Machineईव्हीएम मशीन