शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Jammu and Kashmir: BSF कडून तीन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा, 36 किलो ड्रग्‍स जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 10:57 IST

Jammu Kashmir: 31 जानेवारी रोजी बीएसएफने भारत-पाकिस्तान सागरी सीमेवरुन एका पाकिस्तानी नागरिकाला पकडले. तसेच तीन मासेमारी नौका जप्त केल्या.

श्रीनगर: सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानची घुसखोरी हाणून पाडली आहे. जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये शनिवारी रात्री पाकिस्तानचे 3 घुसखोर भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, तेथे तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी तिघांनाही ठार केले. त्यांच्याकडून बीएसएफने 36 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे. 

शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले होते. दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीवर कारवाई करत, सुरक्षा दलांनी रात्री शहराच्या जाकुरा भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दल परिसरात शोध मोहीम राबवत होते, तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले आणि चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

एक पाकिस्तानी मच्छीमार ताब्यातयापूर्वी 31 जानेवारी रोजी बीएसएफने भारत-पाकिस्तान सागरी सीमेवर गस्त घालताना गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खाडी प्रदेशातून एका पाकिस्तानी नागरिकाला पकडले होते. तसेच तीन मासेमारी नौका जप्त करण्यात आल्या. आखाती प्रदेशात बीएसएफच्या गस्ती नौका पाहून सुमारे चार मच्छिमार पाकिस्तानच्या हद्दीत पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. बीएसएफने पाकिस्तानी मासेमारी नौकांच्या हालचाली पाहिल्या होत्या, ज्यामध्ये चार-पाच मच्छीमार होते. खवळलेल्या समुद्राच्या परिस्थितीचा फायदा घेऊन ते भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते.

ड्रोन जागरुकता कार्यक्रमपाकिस्तानला लागून असलेल्या 198 किमी लांबीच्या सीमेवर राहणारे लोक शेजारील देशाकडून ड्रोन घुसखोरीवर नजर ठेवण्यासाठी बीएसएफला मदत करत आहेत. सीमा सुरक्षा दल (BSF) ने भारत-पाक सीमेवर ड्रोन संबंधित विविध पैलूंबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी 140 हून अधिक ड्रोन जागरुकता कार्यक्रम आयोजित केले आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेवरील आरएस पुरा, अखनूर आणि अरनिया सेक्टरमधील सीमावर्ती वस्त्यांमध्ये ड्रोन जनजागृती करणारे अनेक फ्लेक्स बोर्डदेखील लावण्यात आले आहेत. 

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादBSFसीमा सुरक्षा दलJammu Kashmirजम्मू-काश्मीर