Jammu And Kashmir Since August 5, 765 held in J-K for stone-pelting, says Centre | Jammu And Kashmir : कलम 370 रद्द केल्यानंतर दगडफेकप्रकरणी 765 जणांना अटक
Jammu And Kashmir : कलम 370 रद्द केल्यानंतर दगडफेकप्रकरणी 765 जणांना अटक

ठळक मुद्देकलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकप्रकरणी 765 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.  लोकसभेत मंगळवारी (19नोव्हेंबर) एका लेखी उत्तरात याबाबत माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री किशन रेड्डी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्टनंतर दगडफेकीच्या घटनांमध्ये घट झाल्याची माहिती दिली.

श्रीनगर - काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय संसदेत मंजूर झाल्यानंतर त्याचे हिंसक पडसाद काश्मीरमध्ये उमटले होते. काश्मीरमध्ये काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले. यामध्ये 1 पोलीस जखमी झाला होता. तर खबरदारीचा उपाय म्हणून काही राजकीय नेत्यांसह 100 जणांना अटक करण्यात आली होती. कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकप्रकरणी 765 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे. 

लोकसभेत मंगळवारी (19नोव्हेंबर) एका लेखी उत्तरात याबाबत माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री किशन रेड्डी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्टनंतर दगडफेकीच्या घटनांमध्ये घट झाल्याची माहिती दिली. तसेच दगडफेक आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित 190 प्रकरणांमध्ये 765 जणांना सुरक्षा दलाकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी धोरण आखण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे प्रस्तावित विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. यानंतर लोकसभेत कलम 370 वर वादळी चर्चा झाल्यानंतर हे विधेयक 351 विरुद्ध 72 मताधिक्याने पारित झाले. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारचा ऐतिहासिक विजय झाला. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर करण्याच्या काही महिने आधीपासून त्या राज्यामध्ये सुरक्षास्थिती नियंत्रणात राहावी म्हणून केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या होत्या. 

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात अरिहलमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या आणि तो घडवून आणण्यात सहभागी असलेल्या जैश-ए-मोहम्मदशी संबंधित चार जणांना अटक करण्यात आली आहे. पुलवामाच्या अरिहालमध्ये जुलैमध्ये झालेल्या एका स्फोटप्रकरणी तपासादरम्यान पोलिसांना शारीफ अहमद नावाच्या एका व्यक्तीबाबत संशय होता. तो एका विदेशी दहशतवाद्याशी सातत्याने संपर्कात होता. अहमदने जैशशी संबंधित तीन अन्य व्यक्ती आकिब अहमद, आदिल अहमद मीर आणि ओवैस अहमद यांच्यासोबत कट रचला. हा स्फोट घडवून आणला.

सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात मंगळवारी एक स्फोटक सेट आणि एक वायरलेस सेट जप्त केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरनकोटच्या जंगलात संशयित लोकांच्या हालचाली होत असल्याची माहिती ग्रामीण भागातील लोकांनी दिली. त्यानंतर या भागात सर्च ऑपरेशन करण्यात आले. यात सात आयईडी, गॅस सिलिंडर आणि एक वायरलेस सेट या जंगलातून जप्त करण्यात आला. आतापर्यंत कोणत्याही संशयिताला पकडण्यात आलेले नाही.

 

Web Title: Jammu And Kashmir Since August 5, 765 held in J-K for stone-pelting, says Centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.