शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विकासाला चालना शक्य -मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 05:19 IST

आमच्या सरकारने जम्मू-काश्मीर, लडाखबाबत घेतलेल्या निर्णयाचे भारतीय जनता समर्थन करीत आहे.

नवी दिल्ली : आमच्या सरकारने जम्मू-काश्मीर, लडाखबाबत घेतलेल्या निर्णयाचे भारतीय जनता समर्थन करीत आहे. हा विषय देशाचा असून, त्यात राजकारण आणणे चुकीचे आहे. आतापर्यंत तेथील लोकांना विकासापासून वंचित ठेवण्यात आले होते. त्यामुळेच आजतागायत जम्मू-काश्मीर, लडाखचा आर्थिक विकास झाला नाही. मात्र, आता काश्मीरच्या आणि लडाखच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला आहे.देशातील अनेक लोकांना हा धाडसी निर्णय वाटतो. कारण आजतागायत जे अशक्य वाटत होते ते शक्य होताना दिसत आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, हळूहळू जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येईल.अनुच्छेद ३७० मधील काही कलमेदेशासाठी नुकसानकारक होती. त्यामुळे काही राजकारण्यांना आणि फुटीरतावाद्यांना मदत मिळत होती. अनुच्छेद ३७० व ४५ अ यामुळे जम्मू-काश्मीर, लडाखला देशापासून वेगळे ठेवले गेले होते. गेल्या सात दशकांत त्याचा जनतेला अजिबात फायदा झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे.देशातील प्रत्येक नागरिक, मग तो कोणत्याही राजकीय विचारसरणीचा असो, त्याला आणि जम्मू-काश्मीरमधील जनतेला उज्ज्वल भविष्य हवे आहे.अनुच्छेद ३७० मुळे ते शक्य होत नव्हते. परिणामी, जम्मू-काश्मीरमधील महिला, लहान मुले तसेच अल्पसंख्याक समाजातील लोकांवर प्रचंड अन्याय झाला. आता तिथे बीपीओपासून स्टार्टअपपर्यंत, खाद्यसंस्कृतीपासून पर्यटनापर्यंत अनेक उद्योग उभारले जातील. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळेल आणि काश्मिरी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी चालून येतील, असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी मुलाखतीत केला.कोणी केला विरोध?मोदी यांनी मुलाखतीत सांगितले की, स्वार्थी राजकीय नेते, दहशतवाद्यांना सहानुभूती असलेले लोक आणि काही विरोधी पक्षांचे नेते यांचाच अनुच्छेद ३७० हटविण्यास विरोध होतो.विरोध करणाऱ्यांची यादी केल्यास तुम्हाला हीच मंडळी त्यात असल्याचे आढळून येईल.370अनुच्छेद हटविण्यास जे विरोध करीत आहेत, त्यांनी कधी काश्मिरी जनतेचा आवाज ऐकला आहे का? असा सवाल करून मोदी म्हणाले की, जनतेला राज्यात विकास हवा आहे, स्वत:ची आर्थिक उन्नती हवी आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या स्थानिक पंचायत निवडणुकांत मतदान करण्यासाठी तेथील लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले. त्यांना मतदानापासून रोखण्याचे प्रयत्न अनेकांनी केले; पण लोकांनी त्यांना जुमानले नाही.74% लोकांनी निवडणुकीत मतदान केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा