शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir : अपहरण केलेल्या तीन पोलिसांची दहशतवाद्यांकडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 13:09 IST

Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये बेपत्ता झालेल्या चार पोलिसांपैकी तीन जणांची हत्या करण्यात आली आहे.

श्रीनगर - गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पोलिसांना वारंवार टार्गेट केले जाते. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी रात्री चार पोलिसांचं दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आले होते. यातील तीन पोलिसांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. शोपियान जिल्ह्यातून हे चार पोलीस कर्मचारी बेपत्ता झाले होते. यातील तीन पोलिसांची हत्या करण्यात आल्याचे धक्कादायक शुक्रवारी सकाळी  वृत्त समोर आले आहे. दरम्यान, एका पोलिसाची सुटका करण्यात आली आहे. ''राजीनामा द्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील'', अशी धमकी काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून या पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. 

दरम्यान, या कुकृत्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे, हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. मात्र यामागे हिजबुल मुजाहिद्दीन  दहशतवादी संघटनेनं पोलिसांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तीन विशेष पोलीस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आले होते. फिरदोस अहमद कुचे, कुलदीप सिंग, निसार अहमद धोबी, फयाज अहमद भाट अशी अपहरण करण्यात या पोलिसांचे अपहरण करण्यात आले होते. यातील फय्याज अहमद भाट यांची सुटका करण्यात आली आहे. या सर्व पोलिसांना कुटुंबीयांसमोरच बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केल्याचे म्हटले जात आहे.  

 

 

 

 

 

(भारतासह पाच देशांत ५९% दहशतवादी हल्ले, अमेरिकेचा अहवाल)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी काश्मीर पोलीस दलातील 6 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण केले होते. दहशतवाद्यांनी  दक्षिण काश्मीरमधील पोलिसांच्या घरात घुसून कुटुंबीयांचे अपहरण केले. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेऊन काही दहशतवाद्यांना अटक केली होती. या पार्श्वभूमीवर हे अपहरण म्हणजे पोलीस खात्यावर दबाव आणण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेली खेळी असल्याची माहिती पोलीस खात्यातील सूत्रांनी दिली होती.  

यापूर्वी त्राल परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या मुलाच्या कुटुंबीयांनी दयाभावना दाखवून दहशतवाद्यांनी आपल्या मुलाची मुक्तता करावी, अशी विनंती केली होती. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाला होता.  

तर  काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना अटक केल्याचा तसेच त्यांच्या घरांना आग लावल्याचा आरोप करून काश्मीर खोऱ्यात निषेध आंदोलने करण्यात आली. दरम्यान, दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण करण्याची गेल्या 28 वर्षांमधील ही पहिलीच वेळ आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीPoliceपोलिस