शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये आठवड्याभरात तिसऱ्यांदा सुरक्षा दलांवर हल्ला; तिघांना वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 12:56 IST

सीआरपीएफचे दोन जवान शहीद; पोलीस दलातील एका अधिकाऱ्याला वीरमरण

बारामुल्ला: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला झाला आहे. बारामुल्लीतल्या क्रेझरी भागात सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये जम्मू काश्मीर पोलीस दलातील एक अधिकारी आणि सीआरपीएफच्या दोन जवानांना वीरमरण आलं.सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करून दहशतवाद्यांनी पळ काढला. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा घातला आणि सर्च ऑपरेशन सुरू केलं. त्याआधी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. त्याला जवानांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. यावेळी सुरू असलेल्या कारवाईत पोलिसांचादेखील सहभाग होता. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले. गंभीर इजा झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय जम्मू काश्मीर पोलीस दलातील एका अधिकाऱ्यालादेखील दहशतवाद्यांविरुद्धच्या चकमकीत वीरमरण आलं. याआधी शुक्रवारीदेखील दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाला लक्ष्य केलं. श्रीनगरच्या बाहेर असलेल्या नौगाम बायपासजवळ दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांना वीरमरण आलं. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये सातत्यानं जवान आणि पोलीस पथकांवर दहशतवादी हल्ले होत आहेत. दोन दिवसांपूर्वी बारामुल्लातल्या सोपोरमध्ये लष्कराच्या तुकडीवर हल्ला झाला होता. त्यात एक जवान जखमी झाला होता. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी