जम्मू व कठुआत पाककडून शस्त्रसंधीचे दोनदा उल्लंघन
By Admin | Updated: December 27, 2014 18:55 IST2014-12-27T18:55:30+5:302014-12-27T18:55:30+5:30
जम्मू-जम्मू काश्मीर राज्यात जम्मू व कठुआजवळ असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाक सैनिकांनी लहान शस्त्रांनी गोळीबार करून दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी उत्तर दिले. गेल्या चार दिवसात झालेले हे चौथे शस्त्रसंधी उल्लंघन आहे.

जम्मू व कठुआत पाककडून शस्त्रसंधीचे दोनदा उल्लंघन
ज ्मू-जम्मू काश्मीर राज्यात जम्मू व कठुआजवळ असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाक सैनिकांनी लहान शस्त्रांनी गोळीबार करून दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी उत्तर दिले. गेल्या चार दिवसात झालेले हे चौथे शस्त्रसंधी उल्लंघन आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू जिल्ह्याच्या अरनिया सब सेक्टरमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील विक्रमन चौकीवर शुक्रवारी रात्री पाक सैनिकांनी गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनीही उत्तर दिले. दोन्ही बाजूंकडून होणारा हा गोळीबार मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहिला. या हल्ल्यात कोणाच्याही जखमी होण्याचे वा जीवितहानीचे वृत्त नाही. कठुआ जिल्ह्यातील हीरानगर सेक्टरमध्ये जबोवाल चौकीवरही पाक सैनिकांनी गोळीबार केला. यातही कोणी जखमी झाले नाही.