शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 'जमियत उलेमा ए हिंद'कडून पुनर्विचार याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 17:14 IST

जमियत उलेमा ए हिंदचे अध्यक्ष सय्यद अशहद रशिदी यांनी अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली

नवी दिल्लीः जमियत उलेमा ए हिंदचे अध्यक्ष सय्यद अशहद रशिदी यांनी अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. 217 पानांच्या याचिकेत अयोध्येच्या जागी नमाज पठण केलं जात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 1949मध्ये अवैध पद्धतीनं इमारतीत मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही पूर्ण जागाच रामलल्लाला देण्यात आली आहे, असंही याचिकेत म्हटलं आहे.   पुनर्विचार याचिका ही अयोध्या प्रकरणात पक्षकार असलेल्या एम. सिद्दिक यांचे कायदेशीर वारस असलेल्या मौलाना सय्यद अशहद रशिदी यांनी दाखल केली आहे. न्यायालयानं या प्रकरणात सर्वच पक्षकारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु अवैधरीत्या केलेल्या कृत्यांना माफ करण्यात आलेलं आहे. मुस्लिम पक्षकारांना मशिदीसाठी पर्यायी स्वरूपात पाच एकर जमीन देण्यात येणार आहे. त्याचा विरोध कोणत्याही मुस्लिम पक्षकारांनी केलेला नाही. तसेच या पूर्ण निर्णयालाच आम्ही आव्हान दिलेलं नाही, याचाही सर्वोच्च न्यायालयानं विचार करायला हवा, असंही  मौलाना सय्यद अशहद रशिदी यांनी याचिकेत नमूद केलं आहे.   तसेच एआयएमपीएलबीशी संबंधित जफरयाब जिलानी यांनी सांगितलं की, 9 डिसेंबरपूर्वीच पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. अयोध्या प्रकरणात आम्ही सर्वोच्च न्यायालयात समीक्षा याचिका दाखल केलेली नाही. पण समीक्षा याचिका बनवलेली असून, ती 9 डिसेंबरपूर्वी कधीही दाखल करू शकतो.  ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डसुद्धा पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची चर्चा आहे. मुस्लिम लॉ बोर्ड आठवड्यात ही पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी एक निवेदनात म्हटलं आहे. सुन्नी वक्फ बोर्डाने पुनर्विचार याचिका दाखल केलेली नाही, परंतु त्याचा काहीही फरक पडणार नसून, आम्ही आमचा घटनात्मक अधिकार वापरणार आहोत, तसेच या अधिकाराच्या माध्यमातूनच ही याचिका दाखल करणार आहोत, असेही बोर्डाने सांगितलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त रामजन्मभूमी ही प्रभू श्रीरामाची आहे, असा निकाल दिला होता. तसेच मंदिराच्या बांधणीसाठी केंद्र सरकारने तीन महिन्यांच्या आत एक ट्रस्ट स्थापन करावी, असे आदेश दिले होते. 1989 मध्ये राम मंदिराचे भूमिपूजन झालेले असल्याने राम मंदिराचे बांधकाम सुरू करताना पुन्हा एकदा शीलापूजन करायचे की नाही याबाबत स्पष्टता होऊ शकलेली नाही. उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी 5 एकर जमीन देण्यासाठी तीन ते चार भूखंड पाहून ठेवण्याचे आदेश अयोध्येच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी जमीन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय