शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Jamia Firing : आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याआधी 'तो' होता फेसबुकवर LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 17:04 IST

Jamia Firing : गोळीबारात एक जण जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

नवी दिल्ली: जामिया विद्यापीठाचे विद्यार्थी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करत असताना त्यांच्या दिशेनं गोळी झाडणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. आज दुपारच्या सुमारास जामियाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना एकानं आंदोलकांच्या दिशेनं गोळी झाडली. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव रामभक्त गोपाल शर्मा असं असून तो ग्रेटर नोएडाचा रहिवासी आहे.गोळी झाडणारा गोपाल जामियाचा विद्यार्थी नाही. गोळी झाडण्याआधी गोपालनं अनेकदा जामिया परिसरातून फेसबुक लाईव्ह केलं. सध्या गोपालला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आज मोर्चा काढला. यावेळी राजघाट परिसरात गोपालनं विद्यार्थ्यांच्या दिशेनं गोळीबार केला. गोपालनं केलेल्या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात असताना गोपालनं गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गोपालनं हातातली बंदूक आंदोलकांच्या दिशेनं रोखून धरली असताना त्याच्या पाठीमागे काही अंतरावर मोठ्या संख्येनं पोलीस दिसत आहेत. मात्र तरीही यातल्या एकाही पोलीस कर्मचाऱ्यानं बराच वेळ गोपालला ताब्यात घेण्यासाठी धाव घेतली नाही.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकjamia protestजामिया