शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
3
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
5
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
6
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
7
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
8
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
9
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
10
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
11
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
12
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
13
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
14
गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?
15
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
16
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
17
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
18
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
19
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
20
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार

Jamia Protest: शाहीन बाग, खेल खत्म; त्यानं फेसबुकवर दिले होते गोळीबाराचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 8:00 PM

गोळीबारात एक व्यक्ती जखमी; उपचार सुरू

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवर आज एका व्यक्तीनं गोळीबार केला. ही व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून गोळीबारासारखी कृती करण्याच्या विचारात असल्याचं त्याच्या फेसबुक पेजवरील पोस्टवरुन दिसत आहे. गोळीबार करण्याच्या काही वेळ आधीच त्यानं फेसबुक लाईव्ह केलं होतं. चंदनचा बदला घेण्यासाठी जात असल्याचं त्यानं फेसबुक पेस्टमध्ये म्हटलं होतं. २०१८ मध्ये प्रजासत्ताक दिनी उत्तर प्रदेशातल्या कासगंजमध्ये झालेल्या जातीय संघर्षात चंदन गुप्ताची हत्या झाली होती. फेसबुकवर स्वत:ला रामभक्त म्हणणाऱ्या व्यक्तीनं आपण कोणत्याही संघटनेशी संबंधित नसल्याचं म्हटलं आहे. ३१ जानेवारीपर्यंत माझ्या पोस्टकडे दुर्लक्ष करू नका, अशी एक पोस्ट त्यानं २८ जानेवारीला लिहिली होती. आपण एखादी हिंसक कृती करणार असून त्यात मारलेदेखील जाऊ शकतो, असा अंदाज त्याला होता. त्यामुळेच 'मला अंत्यसंस्काराला नेताना भगवा रंगाच्या कपड्याचा वापर करावा. त्यावेळी जय श्रीरामाच्या घोषणा देण्यात याव्यात,' अशी एक पोस्ट त्यानं फेसबुकवर लिहिली होती. याशिवाय आणखी एका पोस्टमध्ये शाहीन बाग, खेल खत्म, असंदेखील लिहिलं होतं. 

जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांवर गोळीबार करणारा तरुण ग्रेटर नोयडातल्या जेवरचा रहिवासी आहे. तो बारावीचा विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे. तो अल्पवयीन असल्याचा त्याच्या कुटुंबीयांचा दावा आहे. महाविद्यालयात जात असल्याचं सांगून तो घरातून निघाला होता. त्याच्या शाळेच्या दाखल्यावर त्याची जन्मतारीख ८ एप्रिल २००२ अशी आहे. 
आज दुपारच्या सुमारास सीएएच्या निषेधार्थ जामिया मिलियाचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना एका व्यक्तीनं गोळी झाडली. ही व्यक्ती बाहेरुन आली होती. दिल्ली पोलीस झिंदाबाद, जामिया मिलिया मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करत त्यानं गोळी झाडली. यामध्ये जामियाचा एक विद्यार्थी जखमी झाला. त्याला होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्याला एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आलं.  

टॅग्स :jamia protestजामियाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक