शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Jamia Firing : मुलाला गोळीबार करताना टीव्हीवर पाहून आईला आली चक्कर; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 17:18 IST

जामियाचा एक विद्यार्थी जखमी झाला असून, त्यांचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत.

ठळक मुद्देजामियाचा एक विद्यार्थी जखमी झाला असून, त्यांचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. या सर्व प्रकारावर गोळीबार करणाऱ्या मुलाच्या आईचीसुद्धा प्रतिक्रिया आली आहे. माझ्या मुलाची मानसिक स्थिती दोन महिन्यांपासून ठीक नाही. त्याला सध्या उपचाराची गरज आहे.

नवी दिल्लीः जामिया मिलिया इस्मालिया विद्यापीठ परिसरात एका तरुणानं नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलकांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यात जामियाचा एक विद्यार्थी जखमी झाला असून, त्यांचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. या सर्व प्रकारावर गोळीबार करणाऱ्या मुलाच्या आईचीसुद्धा प्रतिक्रिया आली आहे. माझ्या मुलाची मानसिक स्थिती दोन महिन्यांपासून ठीक नाही. त्याला सध्या उपचाराची गरज आहे. तो निर्दोष असून, त्याला अटक करू नका, अशी भावना गोळीबार करणाऱ्या मुलाच्या आईनं व्यक्त केली आहे.शेजारच्यांनी टीव्हीवर तुमच्या मुलाचा फोटो आणि व्हिडीओ दिसतो आहे, असं सांगितल्यानंतर मला हा सर्व प्रकार समजला. त्याच दरम्यान टीव्हीवर मुलाचा फोटो पाहून रडत रडत आई अनेकदा बेशुद्ध पडली. या घटनेनंतर मुलाचे वडीलसुद्धा गायब झाले आहेत. त्या अल्पवयीन मुलाची आई एका खासगी शाळेत शिक्षिका असून, वडील दुकान चालवतात. पण परिवाराची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. घरातील स्थिती चांगली नसल्यानं मुलगा नेहमीच शांत असायचा. त्याच्या मित्रांनीसुद्धा तो शांत असल्याचं बऱ्याचदा सांगितलं होतं. जेव्हा कोणी त्याला घालून पाडून बोलत होते, तेव्हा तो काहीही न बोलता तिथून निघून जायचा. दरम्यान, गोळीबाराचा प्रकार समजल्यानंतर वडिलांनी दुकान बंद केलं आणि मुलाला भेटण्यासाठी जात असल्याचं सांगून ते निघून गेले. परंतु रात्री उशिरापर्यंत त्यांचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. आरोपीला एक छोटा भाऊसुद्धा आहे, तो आठवी इयत्तेत शिकतो. तसेच तो हल्लेखोर विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतील मॅनेजरनं सांगितलं की, मुलाचा जन्म दाखला दाखवला असून, तो अल्पवयीन असल्याचंही स्पष्ट झालेलं आहे. एप्रिल 2002मध्ये त्याचा जन्म झाला आहे.   

टॅग्स :jamia protestजामियाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक