तब्बल नऊ तास जळगावकर अंधारात
By Admin | Updated: October 30, 2015 00:16 IST2015-10-30T00:16:44+5:302015-10-30T00:16:44+5:30
जळगाव : बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील वीज पुरवठा तब्बल नऊ तास खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले.

तब्बल नऊ तास जळगावकर अंधारात
ज गाव : बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील वीज पुरवठा तब्बल नऊ तास खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. पाण्यामुळे विठ्ठलपेठ फिडर मधील एम.आय.डी.सी., शनीपेठ, जोशीपेठ या तीन सेक्शनमधील तसेच गणपती नगर व सिंधी कॉलनी परिसरातील ट्रान्सफार्मर व विजेच्या खांब्यावरील चकत्यांमध्ये अडथळे आल्याने वीज पुरवठा खंडित झाला.वीज कंपनीच्या कर्मचार्यांनी दखल घेत एक वाजेपासून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास सुरुवात केली. अवघ्या दहा मिनीटात पन्नास टक्के भागात पुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता पी. एम. मेहेर यांनी सांगितले. मात्र संपूर्ण वीज पुरवठा सुरू होण्यास तब्बल नऊ तास लागले. २९ च्या पहाटे चार वाजेपर्यंत जोशीपेठातले दोन ट्रान्सफार्मर बंद होते. त्यामुळे तेथील नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. तेथील अडथळे दुरुस्त करून सकाळी पावणे दहा पर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. तसेच गणपती नगर व सिंधी कॉलनी भागातही रात्री १२ वाजेच्या सुमारास खंडित झालेला वीज पुरवठा अडीच ते तीन तासात पूर्ववत सुरू करण्यात आल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एन.बी. चौधरी यांनी सांगितले.