जळकोटमध्ये २६ बालके शाळाबा
By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:13+5:302015-07-06T23:34:13+5:30
जळकोट : शासनाच्या सूचनेनुसार तालुक्यात शनिवारी शाळाबा मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले असता २६ बालके शाळाबा असल्याचे आढळून आले. यात मुले व मुलींची संख्या समान आहे.

जळकोटमध्ये २६ बालके शाळाबा
ज कोट : शासनाच्या सूचनेनुसार तालुक्यात शनिवारी शाळाबा मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले असता २६ बालके शाळाबा असल्याचे आढळून आले. यात मुले व मुलींची संख्या समान आहे. या सर्वेक्षणासाठी १६० अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शनिवारी या सर्वेक्षण करणार्या अधिकारी व कर्मचार्यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. यात १३ मुले आणि १३ मुली शाळाबा असल्याचे आढळून आले. या मोहिमेत तहसीलदार अविनाश कांबळे, गटविकास अधिकारी चंद्रशेखर रामोड, सी.वाय. कांबळे आदींचा सहभाग होता. (वार्ताहर)