राज्यसभेच्या नेतेपदी जेटली, आझाद विरोधी पक्षनेते
By Admin | Updated: June 10, 2014 00:18 IST2014-06-10T00:18:24+5:302014-06-10T00:18:24+5:30
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची सोमवारी राज्यसभेच्या नेतेपदी तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

राज्यसभेच्या नेतेपदी जेटली, आझाद विरोधी पक्षनेते
>नवी दिल्ली : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची सोमवारी राज्यसभेच्या नेतेपदी तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
राज्यसभेचे सभापती हामिद अंसारी यांनी राज्यसभेत जेटली आणि आझाद यांच्या नावांची घोषणा केली. जेटली हे राज्यसभेतील सभागृहाचे नेते राहतील, असे संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी आपल्याला 2 जूनला लेखी पत्रद्वारे कळविले होते. आझाद यांना काँग्रेसचे नेते नियुक्त करण्यात आल्याच्या संदर्भातील पत्र आपल्याला रविवारी प्राप्त झाले, असे अंसारी म्हणाले.
61 वर्षीय जेटली हे संपुआच्या कार्यकाळात राज्यसभेत विरोधी पक्षनेते आणि 65 वर्षीय आझाद आरोग्यमंत्री होते. विशेष म्हणजे जेटली आणि आझाद या दोघांचाही नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. दोघेही राज्यसभेचे सदस्य आहेत. (वृत्तसंस्था)