अरुणाचलच्या सीमावर्ती भागासाठी विशेष पॅकेज देण्यास जेटली राजी
By Admin | Updated: July 3, 2014 05:03 IST2014-07-03T05:03:03+5:302014-07-03T05:03:03+5:30
अरूणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याला एक विशेष पॅकेज देण्याची तयारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दर्शवली आहे़

अरुणाचलच्या सीमावर्ती भागासाठी विशेष पॅकेज देण्यास जेटली राजी
इटानगर : अरूणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याला एक विशेष पॅकेज देण्याची तयारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दर्शवली आहे़
मुख्यमंत्री कार्यालयाने एक पत्रक जारी करून ही माहिती दिली आहे़ येत्या संसद अधिवेशनानंतर लष्करप्रमुखांसह अरूण जेटली राज्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहितीही यात दिली गेली आहे़ शहरात येणाऱ्या लोकांचा लोंढा थोपविण्यासाठी या भागांच्या विकासाला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी व्यक्त केली होती़ काल मंगळवारी नवी दिल्लीत तुकी यांनी जेटलींची भेट घेतली होती़ यावेळी जेटलींनी सीमावर्ती भागांच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले़ सीमा रस्ते विकासाच्या मुद्याचा पाठपुरावा करून विविध योजनांच्या अंमलबजावणीस गती देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली़ (वृत्तसंस्था)