काळ्या पैशावरून घूमजाव नाही : जेटलींचा दावा

By Admin | Updated: October 19, 2014 02:42 IST2014-10-19T02:42:38+5:302014-10-19T02:42:38+5:30

काळा पैसा भारतात परत आणण्याबाबत अन्य देशांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता मावळेल, अशी कोणतीही जोखीम केंद्र सरकार पत्करणार नाही,

Jaitley claims | काळ्या पैशावरून घूमजाव नाही : जेटलींचा दावा

काळ्या पैशावरून घूमजाव नाही : जेटलींचा दावा

नवी दिल्ली : काळा पैसा भारतात परत आणण्याबाबत अन्य देशांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता मावळेल, अशी कोणतीही जोखीम केंद्र सरकार पत्करणार नाही, असे स्पष्ट करून केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी विदेशात जमा असलेला काळा पैसा परत आणण्याच्या आश्वासनापासून सरकारने घूमजाव केल्याचा आरोप फेटाळून लावला. दरम्यान, काळ्या पैशावरून मोदी सरकार सतत देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काळ्या पैशाबाबत सरकारची भूमिका जोखीम असलेली नाही तर दृढनिश्चय असलेली आहे, असे स्पष्ट करून जेटली यांनी फेसबुकवर लिहिले आहे की, ‘विदेशात काळा पैसा जमा करणा:यांची नावे शोधणो, ती नावे जाहीर करणो आणि दोषींना शिक्षा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे; परंतु अन्य देशांसोबत झालेल्या कराराचे उल्लंघन करण्याची जोखीम आम्ही पत्करणार नाही. अन्यथा आम्ही अन्य देशांशी सहकार्य करण्यास सक्षम नाही, असे लोक म्हणतील. अशा प्रकारच्या भूमिकेमुळे काळ्या पैशाच्या खातेधारकांना मदतच होईल. जोखीम पत्करून उचललेले पाऊल अदूरदर्शी ठरेल. पण परिपक्व भूमिका         आम्हाला समस्येच्या मुळार्पयत घेऊन जाईल.’
 विदेशात काळा पैसा जमा करणा:यांची नावे जाहीर करण्यास शुक्रवारी मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात नकार दिला होता. त्यावरून मोदी सरकारवर चौफेर टीका केली जात आहे. जेटली यांनी फेसबुकवर या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, काळ्या पैशावरून मोदी सरकारने केलेल्या घूमजावबाबत काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
 जर्मनी सोबतचा ‘तो’ करार वाजपेयी सरकारच्या काळातील -माकन
4दरम्यान, काळ्या पैशाच्या मुद्यावर मोदी सरकार लोकांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप  काँग्रेसचे मीडिया विभागप्रमुख अजय माकन यांनी केला. 
4काँग्रेस सरकारने 1995 मध्ये जर्मनीसोबत केलेल्या डबल टॅक्सेसन अव्हॉयडन्स अॅग्रिमेंटमुळे मोदी सरकारचे हात बांधले आहेत, हा वित्तमंत्री अरुण जेटली यांचा आरोपही माकन यांनी फेटाळून लावला. 
 
4सप्टेंबर 1996 मध्ये जर्मनीसोबत हा करार झाला आणि त्याची अधिसूचना नोव्हेंबर 1996 मध्ये जारी करण्यात आली. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार नव्हते. 
4अटलबिहारी वाजपेयी यांच्या रालोआ सरकारने आपल्या सुरुवातीच्या काळात गोपनीयतेचे कलम असलेले 14 ‘डबल टॅक्सेसन अव्हॉयडन्स अॅग्रिमेंट’ केले होते. यापैकी तीन करार संशोधित होते; परंतु या मुद्यावर फेरविचार करण्याचा कोणताही प्रय} झाला नाही, असे माकन म्हणाले.
 
 हा मुद्दा ‘योगासन’ होता काय?-नितीशकुमार
4पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपूर्ण लोकसभा निवडणूक प्रचार मोहीम खोटय़ा आश्वासनांवर आधारित होती, अशा शब्दात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि संजद नेते नितीशकुमार यांनी काळ्या पैशावरून मोदी सरकारवर टीका केली.
4सत्तेवर येताच काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. आता ते खातेदारांची नावेही सांगत नाहीत. काळ्या पैशाचा हा मुद्दा केवळ मते मिळविण्यासाठी केलेले बाबा रामदेव यांचे ‘योगासन’ वा ‘शीर्षासन’ होते काय? ते नरेंद्र मोदींचे पोकळ भाषण होते? सर्व खोटारडेपणा केवळ सत्तेसाठी होता, असे नितीशकुमार म्हणाले.
 
केंद्राचे घूमजाव धक्कादायक-तृणमूल
4कोलकाता : काळा पैसा भारतात परत आणण्याच्या संदर्भात नरेंद्र मोदी सरकारने केलेले घूमजाव धक्कादायक आणि संपुआ सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी भावनांशी केलेली दगाबाजी आहे. 
4भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील संगनमताचे हे निदर्शक आहे. सरकारच्या या भूमिकेचा संसदेत आणि संसदेबाहेरही प्रखर विरोध केला जाईल, असे तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Jaitley claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.