शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

पाकचं नापाक पाऊल! जैशचा म्होरक्या मसूद अझहरची तुरुंगातून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 10:26 AM

गुप्तचर विभागाकडून सरकारला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली: पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची सुटका केल्याची माहिती गुप्तचर विभागानं सरकारला दिली आहे. राजस्थानच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्याची कुमक वाढवण्यात आल्यानं सतर्क राहण्याचा इशारादेखील गुप्तचर विभागाकडून देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधूनकलम 370 रद्द करण्यात आल्यानं पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोठा हल्ला करण्याची तयारी पाकिस्तानकडून सुरू असल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं इंग्रजी वृत्तपत्र 'हिंदुस्तान टाईम्स'नं दिलं आहे. पाकिस्तान सियालकोट-जम्मू आणि राजस्थान सेक्टरमध्ये मोठा हल्ला घडवण्याच्या तयारीत आहे. गेल्याच महिन्यात मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरमधूनकलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. भारताचं हे पाऊल पाकिस्तानला चांगलचं खुपलं. त्यानंतर अनेकदा पाकिस्ताननं हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात पूर्णपणे अपयश आल्यानं आता पाकिस्ताननं पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. यानंतर सैन्याला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाकिस्ताननं राजस्थानच्या सीमावर्ती भागात अतिरिक्त सैन्य तैनात केलं आहे. याची माहिती गुप्तचर विभागानं सीमा सुरक्षा दलाला दिली आहे. राजस्थानसह काश्मीरमध्येही हल्ल्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. गेल्याच आठवड्यात पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी याबद्दल अप्रत्यक्ष संकेत दिले होते. 'काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. याप्रकरणी पाकिस्तान जोरदार प्रत्युत्तर देईल आणि याला आंतरराष्ट्रीय समुदाय जबाबदार असेल,' अशी धमकी खान यांनी दिली होती. 

टॅग्स :masood azharमसूद अजहरJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर