शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मोदी सरकारने आणखी एक यंत्रणा निरूपयोगी ठरवली; जयराम रमेश यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 11:52 IST

संसदेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

Jairam Ramsesh: काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी संसदेच्या पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि वन आणि हवामानविषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नरेंद्र मोदींच्या सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, अनेक महत्त्वाची विधेयके स्थायी समितीकडे पाठवली नाहीत. अशा परिस्थितीत या पदावर स्थायी स्वरूपात राहण्यात काहीच अर्थ नाही. स्थायी समितीचे विषय माझ्या हृदयाच्या अगदी जवळचे आहेत आणि माझ्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीला साजेसे आहेत, पण अशा प्रकारच्या गोष्टी घडत असल्याने त्याच्या अध्यक्षपदी राहणे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही, असे काँग्रेसच्या जयराम रमेश यांनी एका पोस्टमध्ये लिहिले.

ट्विटरवरून दिला राजीनामा

जयराम रमेश यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'जैविक विविधता कायदा, 2002 आणि वन संरक्षण कायदा, 1980 आणि नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या स्थापनेसाठी मूलभूत सुधारणा करणारी ही विधेयके आहेत. इतकेच नाही तर डीएनए तंत्रज्ञान (वापर आणि अनुप्रयोग) नियमन विधेयक, २०१९ या समितीने अनेक ठोस सूचनांसह सर्वसमावेशक अहवाल सादर केला होता, जो मागे घेण्यात आला आहे. मोदी सरकारने त्याऐवजी क्रिमिनल प्रोसिजर (डिटेक्शन) कायदा, 2022 ला पुढे केला आहे. अशाप्रकारे जर कामकाज होत असेल तर समितीला काहीच अर्थ नाही, असे मत त्यांनी मांडले. तसेच, मोदी सरकारने आणखी एक संस्थात्मक यंत्रणा निरुपयोगी केली आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले.

आधीही नाराजी व्यक्त केली होती...

जयराम यांनी यापूर्वी जैविक विविधता दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गेल्या आठवड्यातच तीन विधेयके मंजूर झाली होती. जयराम रमेश यांनी वन (संवर्धन) दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यावरही आक्षेप घेतला आणि ते म्हणाले की, ते स्थायी समितीकडे पाठवण्याऐवजी सरकारने हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवले, ज्याचे अध्यक्ष भाजपाचे नेते आहेत.

टॅग्स :Parliamentसंसदcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार