शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

'स्पीड ब्रेकर येत राहतात, पण...', ममता बॅनर्जींच्या स्वबळाच्या घोषणेवर काँग्रेसची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 15:37 IST

Jairam Ramesh on Nyay Yatra: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

Jairam Ramesh Reply on Mamata Decision: सत्ताधारी NDA चा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांनी INDIA आघाडीची स्थापना केली. पण, आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे INDIA आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली. 

मीडियाशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले की, 'कधी स्पीड ब्रेकर येतात, कधी रेड सिग्नल येतात. पण याचा अर्थ असा नाही की, प्रवास थांबला पाहिजे. आम्ही हे सर्व अडथळे पार करणार. काल राहुल गांधींना हाच प्रश्न विचारला होता. ते म्हणाले की, ममता बॅनर्जी आणि टीएमसीशिवाय आम्ही इंडिया आघाडीची कल्पना करू शकत नाही. ममतादेखील काल म्हणाल्या होत्या की, आम्ही भाजपचा पराभव करू. याच भावनेने आम्ही (काँग्रेस) बंगालमध्ये प्रवेश करत आहोत. मधला मार्ग नक्की सापडेल. पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी निवडणूक लढवणार, त्यात सर्व पक्षांचे सहकार्य असेल.'

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'माझी काँग्रेस पक्षाशी जागा वाटपावार कोणतीही चर्चा झालेली नाही. मी नेहमीच म्हटले आहे की, बंगालमध्ये आम्ही स्वबळावर लढू. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि एकहाती भाजपचा पराभव करू. मी इंडिया आघाडीचा भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे, पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली. 

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा उद्या, म्हणजेच 25 जानेवारी रोजी कूचबिहारमार्गे पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी यांनी स्वबळाची घोषणा केल्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. आता काँग्रेसच्या यात्रेत ममता दाखल होणार का, हे पाहणे महत्वाचे आहे. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा