शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

वसुंधरांच्या विरोधात लढणार मानवेंद्र सिंह, राजस्थानात काँग्रेस अन् भाजपात काँटे की टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 17:43 IST

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंचा थेट सामना झालरापाटन जागेवरून भाजपाचे माजी नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांच्याबरोबर होणार आहे.

जयपूर- राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंचा थेट सामना झालरापाटन जागेवरून भाजपाचे माजी नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांच्याबरोबर होणार आहे. मानवेंद्र सिंह यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राजे यांनी झालावाड येथील सचिवालयात निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. 2003पासून वसुंधरा राजे झालरापाटन विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवून विजयी होत आहेत. वसुंधरा राजे जेव्हा 2003मध्ये पहिल्यांदा राजस्थानातील मुख्यमंत्री झाल्या होत्या, त्यावेळी त्यांना जसवंत सिंह यांनी खूप मदत केली होती. इतकंच नव्हे, तर जसवंत सिंह यांनी राज्यात भाजपाला वाढवण्यातही मोठा हातभार लावला होता. परंतु 2014ला त्यांनी भाजपाला राम राम ठोकला आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. मानवेंद्र सिंह यांनी 14व्या लोकसभेत 2004 ते 2009मध्ये बाडमेर-जैसलमेर या जागेवरून प्रतिनिधित्व केलं होतं. 2013मध्ये ते राजस्थानच्या शीव विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून निवडून गेले होते. परंतु 2014ला भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केल्यामुळे मानवेंद्र सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.2015मध्ये पुन्हा त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 17 ऑक्टोबर 2018मध्ये ते काँग्रेसमध्ये गेले. एक भूल, कमळाचं फूल, असं म्हणत त्यांनी काँग्रेसच्या एका रॅलीमध्ये पक्षप्रवेश केला होता. आता काँग्रेसनं त्यांना थेट वसुंधरा राजे यांच्या विरोधात उतरवला आहे. काँग्रेसच्या या पावलानं झालरापाटन चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान